आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
भारताने एका दिवसात 8.3 लाखांहून अधिक इतक्या विक्रमी संख्येने चाचण्या केल्या
2.68 कोटींहून अधिक नमुने आज तपासण्यात आले
प्रति दहा लाख लोकांमध्ये चाचण्यांचे प्रमाण वाढून 19,453 इतके झाले
Posted On:
13 AUG 2020 7:49PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 ऑगस्ट 2020
एकाच दिवसात 8 लाखाहून अधिक चाचण्याचा महत्वाचा टप्पा पार करत भारताने गेल्या 24 तासांत 8,30,391 इतक्या विक्रमी संख्येने चाचण्या केल्या. टेस्ट, ट्रॅक , ट्रीट रणनीतीचा अवलंब करत दररोज 10 लाख चाचण्या करण्याची क्षमता प्राप्त करण्यासाठी भारत सज्ज झाला आहे.
कोविड -19 बाधित रुग्णांचा लवकर शोध घेऊन त्यांचे अलगीकरण करण्यासाठी पहिली महत्त्वाची पायरी म्हणून आक्रमक चाचण्या करण्याच्या केंद्र आणि राज्य / केंद्रशासित प्रदेश सरकारांच्या संकल्प आणि दृढनिश्चयामुळे भारत दररोज घेतल्या जाणार्या चाचण्यांची संख्या वेगाने वाढवत आहे. जुलै 2020 च्या पहिल्या आठवड्यात सुमारे 2.3 लाख इतके साप्ताहिक सरासरी दैनंदिन चाचण्याचे प्रमाण हिते, ते वाढून चालू आठवड्यात 6.3 लाखांहून अधिक झाले आहे.
गेल्या 24 तासांत 8 लाखाहून अधिक इतक्या विक्रमी चाचण्या झाल्या असून आतापर्यंत एकूण 2,68,45,688 कोटी चाचण्या करण्यात आल्या आहेत. प्रति दहा लाख लोकांमध्ये चाचणीचे प्रमाण वाढून 19453 इतके झाले आहे.
देशभरात चाचणी प्रयोगशाळांचा सातत्याने विस्तार झाल्यामुळे हे शक्य झाले आहे. जानेवारी 2020 मध्ये देशात केवळ एक प्रयोगशाळा होती, तर आज देशात 1433 प्रयोगशाळा असून सरकारी क्षेत्रात 947 आणि खासगी 486 प्रयोगशाळा आहेत. केंद्र आणि राज्य / केंद्रशासित प्रदेश सरकारांच्या समन्वित प्रयत्नाचा हा परिणाम आहे.
विविध प्रकारच्या प्रयोगशाळा पुढीलप्रमाणे –
- रिअल- टाईम आरटी पीसीआर चाचणी प्रयोगशाळा: 733 (शासकीय:434 + खासगी: 299)
- ट्रूनॅट आधारीत प्रयोगशाळा: 583 (शासकीय: 480 + खासगी: 103)
- सीबीएनएएटी आधारीत प्रयोगशाळा: 117 (शासकीय: 33 + खासगी: 84 )
कोविड-19 संदर्भात कुठलीही अधिकृत आणि ताजी आकडेवारी/माहिती हवी असल्यास, तसेच काही मार्गदर्शक तत्वे अथवा सूचना बघायच्या असल्यास, कृपया खालील संकेतस्थळाला भेट द्यावी : https://www.mohfw.gov.in/.आणि @MoHFW_INDIA.
तांत्रिक गोष्टींच्या माहितीसाठी संपर्क साधायचा असल्यास, या ईमेल आय डी वर साधावा: technicalquery.covid19[at]gov[dot]in आणि इतर शंका/समस्यांसाठी ईमेल आयडी- ncov2019[at]gov[dot]in
कोविड19 संदर्भात इतर माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक (हेल्पलाईन): +91-11-23978046 किंवा 1075 (Toll-free). सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या हेल्पलाईन्सची यादी सोबत जोडली आहे. https://www.mohfw.gov.in/pdf/coronvavirushelplinenumber.pdf .
B.Gokhale/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1645596)
Visitor Counter : 216