जलशक्ती मंत्रालय
                
                
                
                
                
                
                    
                    
                        जलशक्ती खात्याचे केंद्रीय मंत्री, गजेन्द्र सिंग शेखावत यांनी स्वच्छ भारत मिशन अकादमी केली लॉंच
                    
                    
                        
                    
                
                
                    Posted On:
                11 AUG 2020 7:35PM by PIB Mumbai
                
                
                
                
                
                
                नवी दिल्ली, 11 ऑगस्ट 2020
जलशक्ती खात्याचे केंद्रीय मंत्री, गजेन्द्र सिंग शेखावत यांनी लोकांच्या वाईट   सवयी बदलण्यासाठी आठवड्यापासून सुरू असलेल्या गंदगीमुक्त भारत या मोहिमेचा भाग म्हणून ‘स्वच्छ भारत मिशन अकादमी’ लॉंच केली . 
संबधीत IVR टोल फ्री क्रमांक डायल करून आणि त्यावरून SBM अकादमीकडून आलेला स्वागताचा संदेश ऐकून  गजेन्द्रसिंग शेखावत यांनी SBM अकादमीचे उद्धाटन केले. सवयींमधील बदल शाश्वत टिकावा आणि सर्व संबधीतांची म्हणजेच स्वच्छग्रही आणि इतर क्षेत्रीय कर्मचारी यांची प्रेरणाशक्ती वाढावी म्हणून हा  IVR आधारीत ODF Plus वरील  मोफत मोबाईल ऑनलाईन लर्निंग कोर्स हा SBM(G)च्या फेज 2 मधील अधोरेखित उद्दिष्ट गाठण्याच्या प्रवासात मोलाचा ठरेल.
केंद्रीय मंत्री यावेळी म्हणाले की,  स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) मुळे भारताच्या ग्रामीण भागात प्रचंड परिवर्तन घडून आले आहे. यामुळे स्वच्छतेसाठी जनआंदोलनाला चालना मिळाली.  असे याआधी जगाने कधीही  पाहिले नव्हते. ग्रामीण भाग हागणदारी मुक्त करत  2nd October, 2019  ला सर्व गावे, जिल्हे आणि राज्यांनीही आपण  हागणदारी मुक्त असल्याचे जाहीर केले हे ऐतिहासिक कार्य यामुळे घडून आले.  
या विलक्षण यशाचा पुढील भाग म्हणून ODF  शाश्वतता, आणि त्यासोबतच घनकचरा आणि जलप्रदुषके यांच्या व्यवस्थापन (SLWM) हे लक्ष्य असलेली   SBM (G) ची फेज-2 यावर्षी सुरूवातीला लॉंच झाली आहे.  सर्वांना संडास वापरणे शक्य व्हावे याची खात्री हेच याचे उद्दीष्ट आहे. ते पुढे म्हणाले, स्वच्छ भारत मिशन अकादमी, ही मोबाईल आधारीत तंत्रज्ञानासह स्वच्छाग्रहींचे तसेच PRIs सभासदांच्या प्रशिक्षणाचे उद्दिष्ट साध्य करेल. समाजसंस्था, एनजीओ, SHGs आणि इतर हे SBM (G) च्या फेज-2 शी संलग्न असतील.
यावेळी बोलताना जलशक्ती राज्यमंत्री श्री रतन लाल कटारिया यांनी गेल्या पाच वर्षापासून देशभरातील ग्रामीण भागातील समाजाच्या सवयी बदलण्यासाठी केलेले कार्य आणि त्यासाठीच्या कार्यक्रमातून जनआंदोलन उभे केल्याबद्दलSBM (G) टीम तसेच राज्य सरकारी अधिकारी आणि स्वच्छाग्रहींचे   अभिनंदन केले. त्यांनी हे काम अशाच उत्साहाने SBM फेज 2 मध्येही सुरू ठेवावे अशी आग्रही सूचना केली.
पेयजल आणि सांडपाणी निर्मूलन मंत्रालयाचे (DDWS), सचिव परमेश्वरन अय्यर यांनी SBM अकादमीचे कार्य आणि SBM(G) च्या फेज २ अंतर्गत असलेली  महत्त्वाची भूमिका याचे  विवेचन केले.  ते म्हणाले विनामुल्य, जेव्हा हवा असेल तेव्हा उपलब्ध होणारा, कुठेही, केव्हाही ट्रेनिंग कोर्स देणारी उच्च क्षमतेची आणि उच्च दर्जाचे प्रशिक्षण प्राथमिक मोबाइल फोनवर देणारी अशी ही मोबाईल आधारित अकादमी आहे. यामुळे ज्ञानात भर पडेलच पण सर्व संबधितांचे एकमेकांशी  परस्पर संपर्कामुळे संबध दृढ होऊन  संवादाची क्षमता सुधारेल.
या IVR  आधारित शिक्षण प्रणालीत वेगवेगळ्या ODF तसेत SLWM वर आधारीत विषयांवर 60 मिनिटांचे पाठ आहेत. SBM अकादमी कोर्स मध्ये चार भाग असतील. प्रत्येकात ऑडिओ पाठ असून त्यानंतर प्रत्येक पाठाच्या शेवटी प्रश्नमंजुषा असेल. किमान 50% प्रश्नांची बरोबर उत्तरे दिलेला वापरकर्ता यशस्वी म्हणून गणला जाईल.
सध्या SBM अकादमीचे प्रशिक्षण हिंदीमध्ये  आहे आणि वापरकर्त्याला (18001800404) हा  टोल फ्री नंबर  डायल करावा लागेल आणि मोबाईल फोनवर पूर्ण भाग ऐकावे लागतील.
त्यावेळी काही स्वच्छाग्रही, क्षेत्रीय कर्मचारी आणि राज्यातील अधिकारी यांच्याशी मंत्र्यांनी ऑनलाईन संपर्क साधला. आणि विनामुल्य शिक्षणप्रणाली संपूर्णपणे वापरण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करावे अशी विनंती त्यांना केली
* * *   
B.Gokhale/V.Sahajrao/D.Rane
 
 
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा @PIBMumbai
@PIBMumbai    /PIBMumbai
 /PIBMumbai    /pibmumbai
 /pibmumbai   pibmumbai[at]gmail[dot]com
pibmumbai[at]gmail[dot]com
                
                
                
                
                
                (Release ID: 1645134)
                Visitor Counter : 288
                
                
                
                    
                
                
                    
                
                Read this release in: 
                
                        
                        
                            Punjabi 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Assamese 
                    
                        ,
                    
                        
                        
                            English 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Urdu 
                    
                        ,
                    
                        
                        
                            हिन्दी 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Bengali 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Manipuri 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Odia 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Tamil 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Telugu 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Malayalam