आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
भारताने एका दिवसात 7,19,364 चाचण्यांचा नवा उच्चांक गाठला
आता एकूण चाचण्यांची संख्या झाली 2,41,06,535
Posted On:
09 AUG 2020 5:16PM by PIB Mumbai
एक नवीन उच्चांक स्थापन करत , भारताने एकाच दिवसात 7 लाखाहून अधिक चाचण्या केल्या. गेले अनेक दिवस एकाच दिवसात 6 लाखाहून अधिक चाचण्या सुरू ठेवल्यामुळे भारताच्या चाचण्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या 24 तासांत 7,19,364 चाचण्या घेण्यात आल्या.
अशा सर्वाधिक चाचण्यामुळे दररोज बाधित रुग्ण आढळण्याची संख्याही झपाट्याने वाढेल. मात्र राज्यांना व्यापक शोध मोहीम, त्वरित अलगीकरण आणि प्रभावी उपचारांवर भर देतानाच टेस्ट, ट्रॅक , ट्रीट या केंद्र-प्रणित रणनीतीचा अवलंब करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. गेल्या आठवड्यात ज्या राज्यांमध्ये मृत्यूचे प्रमाण जास्त आहे अशा राज्यांबरोबर अनेक बैठका घेण्यात आल्या आहेत.
अशा भरीव कामगिरीचे परिणाम दिसायला सुरुवात झाली आहे आणि रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही झपाट्याने वाढत आहे . काल एका दिवसात सर्वाधिक 53,879 कोविड रुग्ण बरे होऊन घरी परतले. याबरोबरच बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 14,80,884 वर पोहोचली आहे. उपचार सुरु असलेल्या सक्रिय रुग्णांच्या संख्येपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या दुपटीपेक्षा जास्त आहे (आज 6,28,747) बरे झालेल्या रुग्णांची संख्या सक्रिय रुग्णांच्या 2.36 पटीने अधिक असून हा नवा उच्चांक आहे. सक्रिय रुग्ण घरी अलगीकरणात किंवा रुग्णालयात वैद्यकीय उपचार घेत आहेत.
बरे झालेल्या रूग्णांची संख्या वाढल्यामुळे बरे होण्याचा दर वाढत असून आज हा दर 68.78% आहे.
बरे झालेले रुग्ण आणि सक्रिय रुग्ण यांच्यामधील वाढते अंतर रूग्णालयात किंवा घरी अलगीकरणात असलेल्या रुग्णांच्या तुलनेत बरे झालेल्यांची संख्या जास्त असल्याचे दर्शवते.
केंद्र आणि राज्य / केंद्रशासित प्रदेश सरकारांनी एकत्रितरित्या रुग्णालय आणि वैद्यकीय व्यवस्थापन पायाभूत सुविधा वाढवल्याचा हा परिणाम आहे. या प्रयत्नांमुळे मृत्युदरात आणखी घट झाली असून आज हा दर 2.01% आहे.
कोविड19 संदर्भात कुठलीही अधिकृत आणि ताजी आकडेवारी/माहिती हवी असल्यास, तसेच काही मार्गदर्शक तत्वे अथवा सूचना बघायच्या असल्यास, कृपया खालील संकेतस्थळाला भेट द्यावी : https://www.mohfw.gov.in/.आणि @MoHFW_INDIA.
तांत्रिक गोष्टींच्या माहितीसाठी संपर्क साधायचा असल्यास, या ईमेल आय डी वर साधावा: technicalquery.covid19[at]gov[dot]in आणि इतर शंका/समस्यांसाठी ईमेल आयडी- ncov2019[at]gov[dot]in
कोविड19 संदर्भात इतर माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक (हेल्पलाईन): +91-11-23978046 किंवा 1075 (Toll-free). सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या हेल्पलाईन्सची यादी सोबत जोडली आहे.
https://www.mohfw.gov.in/pdf/coronvavirushelplinenumber.pd
***
B.Gokhale/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1644575)
Visitor Counter : 256
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam