श्रम आणि रोजगार मंत्रालय

देशभरातील 21 ईएसआय रुग्णालयांचे 2400 अलगीकरण खाटांसह समर्पित कोविड-19 रुग्णालयांमध्ये रुपांतर : संतोष गंगवार


फरिदाबाद येथील ईएसआयसी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात प्लाझ्मान बँक सुविधेचा व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून शुभारंभ

Posted On: 08 AUG 2020 6:29PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 8 ऑगस्‍ट 2020

 

केंद्रीय श्रम आणि रोजगार राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) संतोष गंगवार आणि हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी फरिदाबाद (हरियाणा) येथील ईएसआयसी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात प्लाझमा बँक सुविधेचा व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून शुभारंभ केला.

याप्रसंगी बोलताना संतोष गंगवार म्हणाले की, कोविड-19 रुग्णांच्या उपचारासाठी प्लाझमा बँक अतिशय महत्त्वाची सुविधा आहे.

ते पुढे म्हणाले की, कोविड संकटाच्या परिस्थितीत, देशभरातील 21 ईएसआयसी रुग्णालयांचे रुपांतर समर्पित कोविड-19 रुग्णालयांमध्ये करण्यात आले आहे. या रुग्णालयांमध्ये 2400 पेक्षा अधिक अलगीकरण खाटा, 550 आयसीयू/एचडीयू खाटा 200 व्हेंटीलेटर्ससह उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. अलवार (राजस्थान), बिहता, पाटणा (बिहार), गुलबर्गा (कर्नाटक) आणि कोरबा (छत्तीसगड) या 04 ठिकाणी सुमारे 1300 खाटांची विलगीकरण सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

ईएसआयसी रुग्णालय, फरिदाबाद (हरियाणा), बसाईदरपूर (नवी दिल्ली) आणि सनतगर (हैदराबाद) या ठिकाणी कोविड-19 चाचणी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

फरिदाबाद आणि सनतनगर येथील ईएसआयसी रुग्णालयांमध्ये गंभीर कोविड-19 रुग्णांसाठी प्लाझमा उपचारपद्धती पुरवण्यात आली आहे. कोविड-19 विरोधातील लढ्यासाठी संतोष गंगवार यांनी ईएसआयसीची प्रशंसा केली.

 
* * *

B.Gokhale/S.Thakur/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1644434) Visitor Counter : 236