ऊर्जा मंत्रालय
एनटीपीसी समूहाने चालू आर्थिक वर्षात साध्य केली 100 अब्ज युनिटपेक्षा अधिक संचयी वीज निर्मिती
Posted On:
08 AUG 2020 3:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 ऑगस्ट 2020
एनटीपीसी लिमिटेडने जाहीर केल्यानुसार, एनटीपीसी समुहाने चालू आर्थिक वर्षात 100 अब्ज युनिटपेक्षा अधिक संचयी वीज निर्मिती साध्य केली आहे, यातून वीज निर्मिती प्रकल्पांमधील कार्यप्रणाली उत्कृष्ट करण्याची वचनबद्धता आणखी दृढ केली आहे.
केंद्रीय विद्युत प्राधिकरणाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, छत्तीसगडमधील एनटीपीसी कोरबा (2600 MW) विद्युतनिर्मितीसह एप्रिल ते जुलै 2020 दरम्यान 97.42% भार क्षमतेसह सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारा संच ठरला आहे.
तसेच उत्तर प्रदेशातील सिंगरौली येथील एनटीपीसीच्या दोन 200 मेगावॅट संचांनी एप्रिल ते जुलै 2020 दरम्यान प्रत्येकी 99.90% आणि 99.87% अशी देशातील सर्वोच्च भार क्षमता साध्य केली.
एनटीपीसी समुहाकडे 62.9 गिगावॅट स्थापित क्षमतेचे 70 वीज संच आहेत, यात 24 औष्णिक, 7 संयुक्त वायु/द्रवरुप इंधन, 1 जलविद्युत, 13 नवीकरणीय 25 उपसंचासह आणि जेव्ही ऊर्जा केंद्र आहेत. समुहाकडे सध्या 20 गिगावॅट क्षमता निर्माणाधीन आहे, यात 5 गिगावॅटच्या नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांचा समावेश आहे.
* * *
B.Gokhale/S.Thakur/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1644375)
Visitor Counter : 200