वस्त्रोद्योग मंत्रालय
सहाव्या राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त वस्त्रोद्योगमंत्री स्मृती झुबीन ईराणी यांनी दिल्या शुभेच्छा
हँडलूम मार्क स्कीमसाठीचे संकेतस्थळ आणि मोबाईल ऐपचे उद्घाटन, माय हँडलूम पोर्टल, आभासी भारतीय वस्त्रोद्योग मेळा 2020 चा शुभारंभ आणि हस्तकला हातमाग गाव, कुल्लूचे प्रदर्शन
हातमाग उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी दोन सप्ताहांची सोशल मिडीया प्रचार मोहीम, हॅशटॅग #Vocal4Handmade चा शुभारंभ
Posted On:
07 AUG 2020 9:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 ऑगस्ट 2020
केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती झुबीन ईराणी यांनी सहाव्या राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत, या दिनानिमित्त आभासी पद्धतीने आयोजित विशेष कार्यक्रमात बोलतांना त्यांनी 2015 सालापासून 7 ऑगस्ट हा राष्ट्रीय हातमाग दिवस सुरु केल्याबद्दल पंतप्रधानांचे आभार मानले. स्वातंत्र्यपूर्व काळात चरख्याच्या माध्यमातून स्वदेशी चळवळ चालवून महात्मा गांधी यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले, असे त्या म्हणाल्या.
यावेळी स्मृती ईराणी यांच्या हस्ते हँडलूम मार्क स्कीमसाठीचे संकेतस्थळ आणि मोबाईल ऐपचे उद्घाटन झाले. हातमागाच्या अधिकृत उत्पादनांना सामाईक ओळख देण्यासाठी हँडलूम मार्क चा उपयोग होत आहे, असे ईराणी यांनी म्हटले. मुंबईच्या वस्त्रोद्योग समितीने बॅक एंड वेबसह मोबाईल ऐप विकसित केले असून त्यावरुन संपूर्ण नोंदणी प्रक्रिया डिजिटल पद्धतीने होऊ शकेल. इंग्रजी आणि इतर 10 भाषांमध्ये असलेले हे ऐप वापरुन देशाच्या कानाकोपऱ्यात असलेले विणकर हँडलूम मार्कसाठी अर्ज करु शकतील. या ऐपच्या QR कोडवरुन उत्पादनाची सत्यता पटू शकेल.
यावेळी ईराणी यांच्या हस्ते, ‘माय हँडलूम’ पोर्टलचाही शुभारंभ झाला. हातमाग उद्योगासाठीच्या विविध योजनांसाठी विणकर यावरुन आवेदनपत्र सादर करु शकतील. देशात इंडिया हँडलूम हा ब्रांड तयार केल्याबद्दल ईराणी यांनी पंतप्रधानाचे आभार मानले. या ब्रांडअंतर्गत आतापर्यंत 1590 उत्पादनांची नोंदणी झाली आहे, असे त्यांनी सांगितले. या पोर्टलवर हातमाग उद्योगाशी संबंधित सर्व योजनांची माहिती एका क्लिकवर उपलब्ध असून, विणकरांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
ईराणी यांच्या हस्ते आभासी भारतीय वस्त्रोद्योग मेळ्याचेही उद्घाटन झाले. आत्मनिर्भर भारत ध्येयाकडे नेणाऱ्या या आभासी मेळ्यात देशाच्या विविध भागातून 150 लोक सहभागी झाले असून, त्यांची विविध उत्पादने ऑनलाइन प्रदर्शन आणि विक्रीसाठी उपलब्ध आहेत. 7, 10 आणि 11 ऑगस्ट रोजी ह्या मेळ्यांची सुरुवात होणार आहे.
या कार्यक्रमात, हिमाचल प्रदेशातील कुल्लू येथे वसवण्यात येणाऱ्या हस्तकला हातमाग गाव, कुल्लू येथील पारंपारिक हातमाग वस्तूंचे सादरीकरण देखील करण्यात आले.
हातमाग व्यवसायाला प्रोत्साहन मिळावे यासाठी सोशल मिडीयावर दोन सप्ताहांसाठी #Vocal4Handmade हॅशटॅग प्रचार मोहीम राबवली जाणार आहे. या मोहिमेचा शुभारंभही आज इराणी यांच्या हस्ते झाला.
* * *
M.Chopade/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1644251)
Visitor Counter : 209