PIB Headquarters
पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र
Posted On:
03 AUG 2020 7:33PM by PIB Mumbai
दिल्ली-मुंबई, 03 ऑगस्ट 2020

(कोविड-19 संबंधी पत्र सूचना कार्यालयाद्वारे जारी बातम्या आणि सत्यता पडताळणी बातम्या समाविष्ट)



आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 घडामोडींवरील माहिती :
- भारत सरकारच्या औषध नियंत्रकांनी पुण्यातील सीरम इन्सिट्यूट ऑफ इंडियाला ऑक्सफर्ड विद्यापीठ-अँस्ट्रा झेनेका सोबत देशात कोविड विरोधी लस बनविण्याच्या (COVIDSHIELD) क्लिनिकल ट्रायल्सच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यासाठी परवानगी दिली आहे. यामुळे कोविड विरोधी लस बनविण्याच्या कार्याला वेग येईल.
- भारताच्या रुग्ण मृत्यू दरात आणखी घट झाली असून जगाच्या तुलनेत हा दर सर्वात कमी आहे. आज तो 2.11% इतका झाला आहे. कोविड व्यवस्थापनाच्या 'टेस्ट, ट्रॅक अँड ट्रीट' या उत्तम आणि परीणामकारक कार्यवाहीमुळे देशात हा दर गाठणे शक्य झाले आहे. कोविड व्यवस्थापनाच्या धोरणाचे लक्ष्य त्वरित शोध, विलगीकरण,आणि रुग्णांचे सुरळीत व्यवस्थापन आणि अधिक धोकादायक लोकसंख्येच्या विभागात वैद्यकीय कर्मचाऱ्यांची सेवा यामुळे देशात रुग्ण बरे होण्याच्या दरातील वाढ शक्य झाली आहे. गेल्या 24 तासात 40,574रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे बरे झालेल्या कोविड रुग्णांची संख्या 11,86203 इतकी झाली असून बरे होण्याचा दर 65.77% इतका झाला आहे.दरदिवशी बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत गेल्यामुळे बरे झालेले रुग्ण आणि प्रत्यक्ष रुग्ण यातील फरक 6 लाखांपेक्षा जास्त झाला आहे. सध्या तो 6,06,846 इतका आहे. सध्या 5,79357 एवढे रुग्ण उपचाराधिन आहेत. आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाने परदेशातून परतणाऱ्या नागरीकांसाठी 24मे 2020 रोज जाहीर केलेल्या मार्गदर्शक तत्वांची फेररचना केली आहे. दि.8 ऑगस्ट 2020 रात्री एक वाजल्यापासून त्याची अंमलबजावणी सुरू होईल.
- देशभरातील लसीकरणाचा साखळी पुरवठा मजबूत करण्याचे कार्य इलेक्ट्रॉनिक व्हॅक्सीन इंटेलिजन्स नेटवर्ककडून (eVIN) अभिनव तंत्रज्ञानाच्या सहाय्याने केले जात. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या राष्ट्रीय आरोग्य मोहिमेअंतर्गत याची अंमलबजावणी केली जाते. ईवीनचा उद्देश लसींचा साठा आणि प्रवाह, देशभरातील सर्व शीत साखळीतील साठवणूक तापमानावर तात्काळ (रिअल-टाईम) माहिती पुरवली जाते. कोविड संक्रमण काळात आवश्यक लसीकरण सेवा सुरू ठेवण्यासाठी आणि बालकांना आणि गर्भवती मातांना लस प्रतिबंधक रोगापासून बचावासाठी आवश्यक असलेल्या सानुकूलनेसह या मजबूत प्रणालीचा वापर करण्यात आला आहे. कोविड-19 वर लस जेंव्हा केंव्हा उपलब्ध होईल, तेंव्हा या सशक्त व्यासपीठाचा लाभ घेता येईल एवढी यात क्षमता आहे.
इतर अपडेट्स:
महाराष्ट्र अपडेट्स :
टाळेबंदी शिथिल केल्यानंतर ग्रामीण महाराष्ट्रात कोविड-19 रुग्णांची संख्या वाढत आहे. मुंबईनजीकच्या ठाणे, रायगड शहरांमध्येही रुग्णसंख्या वाढत आहे. हीच परिस्थिती नाशिक, औरंगाबाद, धुळे आणि सांगली जिल्ह्यांतील ग्रामीण भागात दिसून येत आहे. महाराष्ट्रात रविवारी 9,926 रुग्णांना सुट्टी देण्यात आली, तरीही 9,509 नवीन कोविड रुग्णांची नोंद झाली. राज्यातील सक्रीय रुग्णांची संख्या 1,48, 537 एवढी आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे, त्यामुळे अधिकाधिक लोक भीती बाजूला सारुन कोविड चाचण्यांसाठी समोर येत आहेत.

***
M.Chopade/S.Thakur/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1643211)
Visitor Counter : 302
Read this release in:
Malayalam
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada