आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
भारतातील कोविड मृत्यू दर 2.15%पहिल्या टाळेबंदीपासूनचा आतापर्यंत सर्वात कमी,
एकूण बरे झालेले रुग्ण सुमारे 11 लाख
गेल्या 24 तासांत 36,500 पेक्षा अधिक रुग्ण बरे
Posted On:
01 AUG 2020 4:31PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 ऑगस्ट 2020
भारतात जागतिक पातळीपेक्षा कोविड-19 चा सर्वात कमी मृत्यूदर नोंद होण्याचा विक्रम कायम आहे. आज भारतातील मृत्यू दर 2.15% आहे, हा दर पहिली टाळेबंदी जाहीर केल्यापासून सर्वात कमी आहे. तो जूनच्या मध्यात 3.33% होता, तेंव्हापासून यात सातत्याने घट होत आहे.
केंद्र सरकारच्या मार्गदर्शनाखाली राज्य सरकारे/केंद्रशासित प्रदेशांसमवेत लक्षकेंद्री, संयोजनबद्ध, पूर्व नियोजन आणि श्रेणीबद्ध पद्धतीने अवलंबिलेल्या “टेस्ट ट्रॅक ट्रीट” धोरणाचे यश आहे. जलद चाचण्यांद्वारे लवकर निदान आणि रुग्णालयात दाखल झालेल्या प्रकरणांचे प्रभावी रुग्णालय व्यवस्थापन, यामुळे भारतात कोविड-19 चा मृत्यूदर सातत्याने कमी करण्यात यश आले आहे. मृत्यूदर कमी ठेवण्याबरोबरच, प्रभावी प्रतिबंध योजनेची यशस्वी अंमलबजावणी, अधिकाधिक चाचण्या आणि एकंदरीत प्रमाणीत दृष्टीकोनामुळे सातत्याने दरदिवशी 30,000 रुग्ण बरे होत आहे. बरे झालेल्या रुग्णांची संख्या 11 लाखांच्या जवळ आहे. गेल्या 24 तासांत 36,569 रुग्णांना सुट्टी देण्यात आली आहे. याबरोबरच आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 10,94,374 एवढी झाली आहे. कोविड-19 रुग्ण बरे होण्याचा दर 64.53% एवढा आहे.
नियमितपणे रुग्ण बरे होत असल्यामुळे, बरे झालेले रुग्ण आणि सक्रीय रुग्ण यातील अंतर 5,29,271 एवढे आहे. सक्रीय रुग्ण (5,65,103) सध्या वैद्यकीय निरीक्षणाखाली आहेत.
अखंड रूग्ण व्यवस्थापनासह 3-स्तरीय रुग्णालयाच्या पायाभूत सुविधेमुळे त्वरित उपचार आणि उपचारांची खात्री दिली आहे. आजपर्यंत 1488 कोविड समर्पित रुग्णालये आहेत, 2,49,358 अलगीकरण खाटा, 31,639 आयसीयू खाटा आणि 1,09,119 ऑक्सिजनची सुविधा असलेल्या खाटा आहेत, 16,678 व्हेंटीलेटर्स, 3231 समर्पित कोवविड आरोग्य केंद्र ज्यात 2,07,239 अलगीकरण खाटा, 18,613 आयसीयू खाटा आणि 74,130 ऑक्सिजनची सुविधा असलेल्या खाटा आणि 6,668 व्हेंटीलेटर्स कार्यरत आहेत. याव्यतिरिक्त, 10,755 कोविड केअर सेंटरमध्ये 10,02,681 खाटा उपलब्ध आहेत. केंद्र सरकारने 273.85 लाख N95 मास्क आणि 121.5 लाख वैयक्तिक सुरक्षा उपकरणे (पीपीई) आणि 1083.77 लाख एचसीक्यु गोळ्या राज्ये/ केंद्रशासित प्रदेश/ केंद्रीय संस्थांना पुरवल्या आहेत.
कोविड 19 संदर्भात कुठलीही अधिकृत आणि ताजी आकडेवारी/माहिती हवी असल्यास, तसेच काही मार्गदर्शक तत्वे अथवा सूचना बघायच्या असल्यास, कृपया खालील संकेतस्थळाला भेट द्यावी : https://www.mohfw.gov.in/.
तांत्रिक गोष्टींच्या माहितीसाठी संपर्क साधायचा असल्यास, या ईमेल आय डी वर साधावा: technicalquery.covid19[at]gov[dot]in आणि इतर शंका/समस्यांसाठी ईमेल आयडी- ncov2019[at]gov[dot]in.
कोविड-19 संदर्भात इतर माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक (हेल्पलाईन): +91-11-23978046 or 1075 (Toll-free). सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या हेल्पलाईन्सची यादी सोबत जोडली आहे. https://www.mohfw.gov.in/pdf/coronvavirushelplinenumber.pdf.
G.Chippalkatti/S.Thakur/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1642861)
Visitor Counter : 198
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam