आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
भारतातील कोविडचे रुग्ण बरे होण्याचा आकडा 10 लाखांच्या पार
सलग सातव्या दिवशी 30,000 हून अधिक रुग्ण झाले बरे
16 राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील रुग्ण बरे होण्याचा दर राष्ट्रीय सरासरी 64.44% पेक्षा अधिक
सरासरी 2.21% या राष्ट्रीय मृत्यू दराच्या तुलनेत 24 राज्य/केंद्रशासित प्रदेशातील मृत्यू दर कमी
Posted On:
30 JUL 2020 7:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 जुलै 2020
भारतात कोविड-19 च्या बरे झालेल्या रुग्णांची संख्या 10 लाखांहून अधिक झाल्याची महत्वपूर्ण नोंद करण्यात आली आहे.
डॉक्टर, परिचारिका आणि सर्व आघाडीच्या आरोग्यसेवा कामगारांच्या कर्तव्यनिष्ठा आणि नि: स्वार्थ त्यागामुळेच कोविड -19 रूग्णांच्या बरे होण्याच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे. 1 जून ला कोविड-19 चे रुग्ण बरे होण्याचा आकडा 1 लाख होता आणि केंद्र व राज्य / केंद्रशासित प्रदेश सरकारच्या कोविड -19 व्यवस्थापन योजनेच्या समन्वयित अंमलबजावणीमुळेच यात सातत्याने वाढ होत आज हा आकडा दहा लाखाहून अधिक झाला आहे.
एकत्रीत पद्धतीने प्रभावी प्रतिबंधित धोरण, जलद चाचणी आणि प्रमाणित क्लिनिकल व्यवस्थापन प्रोटोकॉलची यशस्वी अंमलबजावणीच्या आधारेच सलग सातव्या दिवशी कोविडचे 30,000 हून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. जुलैच्या पहिल्या आठवड्यात कोविडचे 15,000 रुग्ण बरे झाले होते; रुग्ण बरे होण्याच्या दैनंदिन सरासरी प्रमाणात निरंतर वृद्धी होऊन जुलै च्या शेवटच्या आठवड्यात सुमारे 35,000 रुग्ण बरे झाले.
गेल्या 24 तासात 32,553 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी दिल्यामुळे बरे झालेल्या रुग्णांचा आकडा 10,20,582 वर पोहोचला आहे. कोविड-19 रुग्णांचा बरे होण्याचा दर आता 64.44 % झाला आहे. बरे झालेले रूग्ण आणि सक्रिय कोविड -19 रुग्णांमधील अंतर सध्या 4,92,340 इतके आहे. या आकडेवारीनुसार बरे झालेलं रुग्ण हे सक्रीय रुग्णांच्या 1.9 पट आहेत ( सर्व 5,28,242 सक्रीय रुग्णांवर वैद्यकीय उपचार सुरु आहेत)
अविरत क्लिनिकल व्यवस्थापनासाठी परवडणार्या रुग्णालयाच्या पायाभूत सुविधा वृद्धिंगत करण्यासाठी राज्य / केंद्रशासित प्रदेश सरकारांनी स्थानिक पातळीवर अनेक उपाययोजना केल्या आहेत. 16 राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील मृत्यू दर हा राष्ट्रीय सरासरी मृत्यू दरापेक्षा कमी आहे हे त्याचेच यश आहे.
सार्वजनिक आणि खासगी क्षेत्राच्या एकत्रित प्रयत्नांमुळे रुग्णालयाच्या पायाभूत सुविधांमध्ये वृद्धी होऊन तसेच जलद चाचणी सुविधा उपलब्ध झाल्यामुळे कोविड-19 च्या रूग्णांची लवकर ओळख पटवून त्यांची जलद गतीने चाचणी घेण्यात आल्यामुळे मृत्यू दर कमी होण्यात मदत झाली आहे. गंभीर रुग्ण आणि अति-जोखीम असणाऱ्या रुग्णांची काळजी घेण्यासोबतच प्रतिबंधित धोरणाचे संपूर्ण लक्ष जलद शोध आणि अलगिकरणावर केंद्रित केले आहे. यामुळे हे सुनिश्चित झाले आहे की, जागतिक सरासरी 4% मृत्यू दराच्या तुलनेत भारतातील मृत्यू दर 2.21% आहे. 24 राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमध्ये राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी सीएफआर आहे आणि 8 राज्ये / केंद्र शासित प्रदेशत 1% च्या खाली सीएफआरची नोंद झाली आहे.
कोविड 19 संदर्भात कुठलीही अधिकृत आणि ताजी आकडेवारी/माहिती हवी असल्यास, तसेच काही मार्गदर्शक तत्वे अथवा सूचना बघायच्या असल्यास, कृपया खालील संकेतस्थळाला भेट द्यावी : https://www.mohfw.gov.in/ आणि @MoHFW_INDIA
तांत्रिक गोष्टींच्या माहितीसाठी संपर्क साधायचा असल्यास, या ईमेल आय डी वर साधावा: technicalquery.covid19[at]gov[dot]in आणि इतर शंका/समस्यांसाठी ईमेल आयडी- ncov2019[at]gov[dot]in. आणि @CovidIndiaSeva .
कोविड19 संदर्भात इतर माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक (हेल्पलाईन): +91-11-23978046 or 1075 (Toll-free). सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या हेल्पलाईन्सची यादी सोबत जोडली आहे.
https://www.mohfw.gov.in/pdf/coronvavirushelplinenumber.pdf.
* * *
M.Chopade/S.Mhatre/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1642412)
Visitor Counter : 278
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam