पंतप्रधान कार्यालय

आंतरराष्ट्रीय तापनाभिकीय प्रायोगिक अणुभट्टी (आयटीईआर) येथे आयटीईआर असेंब्लीचे काम सुरु झाल्यानिमित्त पंतप्रधानांकडून संदेश

Posted On: 29 JUL 2020 10:50PM by PIB Mumbai

 नवी दिल्ली, 29 जुलै 2020

आयटीईआर संघटनेने  आज 28 जुलै 2020 रोजी फ्रान्समधील सेंट पॉल-लेझ-दुरांस  येथे आयटीईआर टोकमॅकच्या असेम्ब्लीचे काम सुरु झाल्यानिमित्त सोहळा  आयोजित केला. सर्व आयटीईआर सदस्य देशांचे आमंत्रित प्रमुख वैयक्तिकरित्या किंवा रिमोट मोडद्वारे इलेक्ट्रॉनिकरित्या सहभागी  झाले  किंवा त्यांनी आपला संदेश पाठवला . फ्रान्सचे राष्ट्रपती मॅक्रॉन यांनी हा आभासी सोहळा आयोजित केला.

आपल्या संदेशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयटीईआर संघटनेचे  आत्तापर्यंत केलेल्या परिश्रम आणि यशाबद्दल अभिनंदन केले. वैज्ञानिक आणि अभियंत्यांच्या जागतिक सहभागाची दखल घेऊन त्यांनी आयटीईआर हे भारताच्या - वसुधैव कुटुंबकम् - या विश्वासाचे अतिशय योग्य उदाहरण असल्याचे नमूद केले.  मानवजातीच्या कल्याणासाठी  संपूर्ण जग एकत्र काम करत आहे आणि भारत आयटीईआरला त्याचे लक्ष्य साध्य करण्यासाठी आणि प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी , क्रायोस्टॅट, इन-व्हेसल शिल्ड्स, कुलिंग वॉटर क्रायोजेनिक आणि क्रायो-वितरण प्रणाली, आरएफ आणि बीम तंत्रज्ञान वापरून सहाय्यक हीटिंग उपकरणेबहु -मेगा वॅट वीज पुरवठा आदींमध्ये भरीव योगदान देत असल्याचा भारताला सार्थ अभिमान वाटतो.

या प्रसंगी, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संदेश फ्रान्स आणि मोनाको येथील  भारताचे राजदूत जावेद अशरफ यांनी वाचून दाखवला.

संदेशाचा संपूर्ण मजकूर खालील लिंकवर वाचा

http://dae.gov.in/writereaddata/iter2020_message_pm_india_shri_narendra_modi.pdf

 

 

G.Chippalkatti/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1642190) Visitor Counter : 249