आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
भारतात सलग दुसऱ्या दिवशी पाच लाखांहून अधिक चाचण्या
1.73 कोटींपेक्षा अधिक नमुन्यांची आज तपासणी
प्रतिदशलक्ष चाचण्यांचे प्रमाण 12,562 वर पोहोचले
Posted On:
28 JUL 2020 7:06PM by PIB Mumbai
चाचणी, पाठपुरावा, उपचार (टेस्ट, ट्रॅक, ट्रीट) या धोरणानुसार भारताने सलग दोन दिवस प्रतिदिन पाच लाखांहून अधिक कोविड – 19 नमुन्यांची चाचणी करण्याचा नवीन उच्चांक कायम ठेवला आहे. कोविड – 19 पॉझिटिव्ह रुग्णांची लवकर ओळख आणि विलगीकरणातील पहिली महत्त्वाची पायरी म्हणून प्राधान्याने चाचणी करण्याबाबत केंद्रासह राज्यसरकारे / केंद्रशासित प्रदेश यांच्यातील सामायिक आणि केंद्रित प्रयत्नांचा झालेला हा परिणाम आहे. 26 जुलै रोजी, भारतात एकूण 5,15,000 नमुने तपासले गेले आणि 27 जुलै रोजी, एकूण 5,28,000 नमुने तपासण्यात आले.
वर्गीकृत आणि सतत वाढणाऱ्या प्रतिसादामुळे देशातील चाचणीचे जाळे सातत्याने वाढविण्यात आले असून आजवर केलेल्या प्रतिदशलक्ष चाचण्यांचे प्रमाण 12,562 वर पोहोचले आहे. आज पर्यंत 1.73 कोटी चाचण्यांचा आकडा ओलांडला गेला आहे.
पंतप्रधानांच्या हस्ते काल व्हर्च्युअल पद्धतीने उद्घाटन झालेल्या नोएडा, मुंबई आणि कोलकाता येथे तीन उच्चप्रतीच्या चाचणी सुविधांचा समावेश करून भारताच्या चाचणी क्षमतेस आणखी गती मिळाली आहे.
देशातील 1310 प्रयोगशाळांसह चाचणी प्रयोगशाळेचे जाळे सातत्याने बळकट केले जात आहे.सध्या 905 सरकारी प्रयोगशाळा आणि 405 खासगी प्रयोगशाळा कार्यरत आहेत. या मध्ये खालील प्रयोगशाळा समाविष्ट आहेत :
रिअल टाइम रॅपिड टेस्ट पीसीआर आधारित चाचणी प्रयोगशाळा 668 : (शासकीय : 407 + खासगी : 261)
ट्रू नॅट आधारित चाचणी प्रयोगशाळा : 537 (शासकीय : 467 + खासगी : 70)
सीबीएनएएटी आधारित चाचणी प्रयोगशाळा 105 : (शासकीय : 31 + खासगी 74)
......
B.Gokhale/S.Shaikh/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1641860)
Visitor Counter : 207