शिक्षण मंत्रालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी 1 ऑगस्ट 2020 रोजी व्हिडिओ-कॉन्फरन्सद्वारे जगातील सर्वात मोठ्या ऑनलाइन हॅकेथॉनच्या ग्रँड फिनालेला संबोधित करणार
Posted On:
27 JUL 2020 9:28PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 जुलै 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी, 1 ऑगस्ट 2020 रोजी आयोजित जगातील सर्वात मोठ्या ऑनलाइन हॅकेथॉनच्या ग्रँड फिनालेला संध्याकाळी 7 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संबोधित करणार आहेत. याची घोषणा करताना केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांनी आज सांगितले की, स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2020 (सॉफ्टवेअर) चा ग्रँड फिनाले 1 ते 3 ऑगस्ट, 2020 दरम्यान आयोजित केला जाईल. हे हॅकेथॉन मनुष्यबळ विकास मंत्रालय, भारत सरकार, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (एआयसीटीई), पर्सिस्टंट सिस्टीम्स आणि i4c यांनी आयोजित केले आहे.
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांनी आज स्मार्ट इंडिया हॅकेथॉन विषयी आयोजित उच्चस्तरीय बैठकीचे अध्यक्षस्थान भूषविले आणि यापूर्वी आयोजित केलेल्या हॅकेथॉनच्या कामगिरीविषयी चर्चा केली. या बैठकीला उच्च शिक्षण सचिव अमित खरे, एआयसीटीई चे अध्यक्ष अनिल सहस्रबुद्धे, अतिरिक्त सचिव, एमएचआरडी राकेश रंजन आणि मुख्य नवोपक्रम अधिकारी, एमएचआरडी अभय जेरे उपस्थित होते.
स्मार्ट इंडिया हॅकेथॉन हा आपल्या देशासमोरची आव्हाने सोडविण्यासाठी नवीन डिजिटल तंत्रज्ञान नवकल्पना ओळखण्यासाठी एक खास उपक्रम आहे असे केंद्रीय मंत्री म्हणाले. ही एक निरंतर सुरु राहणारी डिजिटल उत्पादन विकास स्पर्धा आहे, जिथे तंत्रज्ञानाच्या विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण उपाययोजना शोधण्यासाठी नवनवीन आव्हाने दिली जातात. यामुळे विद्यार्थ्यांना सरकारी विभाग आणि खाजगी क्षेत्रातील संस्थांसमोर असलेल्या आव्हानांवर काम करण्याची संधी मिळते, ज्यासाठी ते चौकटी बाहेरील आणि जागतिक दर्जाचे निराकरण देऊ शकतात.
एसआयएच 2020 साठी जानेवारीत महाविद्यालयीन स्तरावरील हॅकेथॉनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कल्पनांची प्रथम स्तरावरील तपासणी केली गेली आणि महाविद्यालयीन स्तरावरील विजयी संघांना एसआयएचच्या राष्ट्रीय टप्प्यासाठी पात्र ठरविण्यात आले. राष्ट्रीय स्तरावरील तज्ज्ञ आणि मूल्यांकनकर्त्यांनी या कल्पनांचे परीक्षण केले. आता केवळ निवडक संघच ग्रँड फिनालेमध्ये सहभागी होऊ शकतील.
स्मार्ट इंडिया हॅकेथॉनच्या आत्तापर्यंतचे परिणाम म्हणजे, जवळपास 331 प्रोटोटाइप विकसित केले आहेत, 71 स्टार्टअप्स तयार होत आहेत, 19 स्टार्टअपची यशस्वीरित्या नोंदणी झाली आहे. त्याव्यतिरिक्त, वेगवेगळ्या विभागांमध्ये 39 उपाययोजना लागू केल्या असून 64 प्रस्तावित उपाययोजनांच्या प्रगतीसाठी अर्थ सहाय्य देण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी कृपया येथे भेट द्या : https://www.sih.gov.in/
* * *
M.Chopade/S.Mhatre/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1641661)
Visitor Counter : 236