आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

बरे झालेल्यांच्या संख्येचा एका दिवसातील उच्चांक, 36,000 पेक्षा जास्त रुग्णांना घरी सोडण्यात आले


सक्रिय कोविड रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या 4 लाखांहून अधिक

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण नव्या उच्चांकावर, आज हे प्रमाण जवळपास 64%

Posted On: 26 JUL 2020 5:30PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 26 जुलै 2020

 

काल बरे झालेल्यांचा एका दिवसातील आत्तापर्यंतचा उच्चांक नोंदविण्यात आला. गेल्या 24 तासांत 36,145 कोविड -19 रूग्ण बरे झाले आणि त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे बरे झालेल्यांची एकूण संख्या 8,85,576 वर गेली आहे. रुग्ण बरे होण्याच्या दराने जवळपास 64% पर्यंत नवी उच्च पातळी गाठली आहे. आज हा दर 63.92% होता. याचा अर्थ रूग्ण बरे होण्याचे प्रमाण सातत्याने वाढत असून सक्रिय रुग्ण आणि बरे होणारे यातील वाढणारी तफावत कायम राखली जात आहे. ही तफावत 4 लाखांच्या पुढे गेली आणि सध्या ती 4,17,694 आहे. बरे होणाऱ्यांचे प्रमाण सक्रिय (4,67,882) रुग्णांपेक्षा 1.89 पट  आहे.

 केंद्र सरकारने सर्व राज्य / केंद्रशासित प्रदेश सरकारांना चाचणी, शोध आणि उपचार या धोरणाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचा सल्ला दिला आहे. गेल्या 24 तासांत 4,40,000 पेक्षा जास्त चाचण्या घेण्यात आल्या आहेत. आजवर केलेल्या प्रति दशलक्ष चाचण्यांचे प्रमाण 11,805 वर पोहोचले असून, आत्तापर्यंत एकूण 1,62,91,331 चाचण्या करण्यात आल्या आहेत. प्रथमच, सरकारी प्रयोगशाळांनी 3,62,153 नमुन्यांची चाचणी करण्याचा नवा विक्रम नोंदविला आहे. खासगी प्रयोगशाळांमध्ये एकाच दिवसात 79,878 नमुन्यांची चाचणी घेण्यात आली असून हा आजवरचा उच्चांक आहे.

सार्वजनिक आणि खासगी क्षेत्राच्या सहभागाने रुग्णालयाच्या पायाभूत सुविधांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याने कोविड -19 च्या रुग्णांचे लवकर निदान होऊन त्वरित उपचारांमुळे मृत्यू दर सातत्याने कमी झाला आहे. सध्या तो 2.31% आहे. सर्वात कमी मृत्यूचे प्रमाण असणाऱ्या जगातील देशांमध्ये भारताचा समावेश आहे.

कोविड -19 शी संबंधित सर्व तांत्रिक मुद्यांविषयी, मार्गदर्शक तत्वांविषयी आणि सल्ल्यासंबंधी अधिकृत व अद्ययावत माहितीसाठी कृपया येथे नियमितपणे भेट द्या: https://www.mohfw.gov.in/आणि @MOHFW_INDIA.

कोविड -19 शी संबंधित तांत्रिक प्रश्न technicalquery.covid19[at]gov[dot]in यावर तर इतर प्रश्न ncov2019[at]gov[dot]in and @CovidIndiaSeva यावर पाठवू शकता.

कोविड -19 वर काही प्रश्न असल्यास कृपया आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाशी संपर्क साधा : + 91-11-23978046 या हेल्पलाइनवर किंवा 1075 (टोल फ्री) क्रमांकावर. कोविड -19 वरील राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या हेल्पलाइन क्रमांकाची यादी देखील https://www.mohfw.gov.in/pdf/coronvavirushelplinenumber.pdf. यावर उपलब्ध आहे.

 

 

M.Chopade/ V.Joshi/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1641401) Visitor Counter : 205