विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

पुणेस्थित मायलॅब डिस्कव्हरी सोल्युशन्सने कोविड-19 चाचणी कीटचे उत्पादन वाढवले

Posted On: 25 JUL 2020 5:23PM by PIB Mumbai

 

पुणेस्थित मायलॅब डिस्कव्हरी सोल्युशन्सने पॅथोडिटेक्ट या कोविड-19 चाचणी कीटचे उत्पादन वाढवले आहे, जैवतंत्रज्ञान विभागाच्या (डिबीटी) नॅशनल बायोफार्मा मिशन आणि जैवतंत्रज्ञान उद्योग संशोधन सहाय्य परिषद (बीआयआरएसी)च्या धोरणात्मक निधीच्या मदतीने उत्पादन वाढवले आहे.  

हसमुख रावल, मायलॅब डिस्कव्हरी सोल्युशन्सचे व्यवस्थापकीय संचालक म्हणाले, “आमच्यावर कोणी विश्वास ठेवला नव्हता, त्याकाळात बीआयआरएसीने आम्हाला मदतीचा हात दिला. मिळालेल्या निधीमुळे आम्ही निश्चितच उत्पादन आणखी वाढवू”.

जैवतंत्रज्ञानाच्या विभागाच्या सचिव आणि बीआयआरएसीच्या अध्यक्ष डॉ रेणु स्वरुप म्हणाल्या “सध्या सुरु असलेल्या महामारीविरोधात, गुणवत्तापूर्ण आरटी-पीसीआर स्वदेशी उत्पादनामुळे देशभरात चाचण्या वाढवण्यासाठी उपयुक्त ठरले. मायलॅब पॅथोडिटेक्ट उत्पादनात वाढ, ही डिबीटीने पूर्वीच घेतलेल्या निर्णयाच्या दिशेने पाऊल आहे. तसेच ते पंतप्रधानांच्या आत्मनिर्भर भारताच्या संकल्पाशी निगडीत आहे.”

सध्या मायलॅबची 2,00,000 आरटी-पीसीआर आणि 50,000 आरएनए चाचणी उत्पादन क्षमता आहे. एनएटी, एचआयव्ही, एचबीव्ही, एचसीव्ही आणि कोरोना विषाणू निदान/एसएआरएस-सीओव्ही-2 साठी मायलॅबला सीडीएससीओ/अन्न आणि औषध प्रशासन आणि आयसीएमआरची मान्यता आहे.

कंपनीने नुकतीच एक आण्विक प्रयोगशाळा मशीन कॉम्पॅक्ट एक्सएल सुरू केली आहे जी विविध अभिकर्मकांची निर्मिती तसेच एकाच मशीन युनिटमध्ये अनेक आण्विक चाचण्या करू शकते. या मशिनमुळे भारताला ग्रामीण भागात आण्विक निदान प्रयोगशाळा स्थापन करता येतील, यामुळे कमी कर्मचारी संख्येत जास्तीत जास्त करण्यात येतील आणि मोठ्या पायाभूत खर्च, भांडवली खर्च आणि परिचालन खर्चात कपात होईल. 

***

B.Gokhale/S.Thakur/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1641203) Visitor Counter : 214