वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

भारत-ब्रिटन यांनी मुक्त व्यापार करार आणि त्यासाठी टप्प्याटप्प्याने मर्यादित व्यापार करार करण्याप्रति कटिबद्धता व्यक्त केली

Posted On: 25 JUL 2020 2:24AM by PIB Mumbai

 

24 जुलै 2020 रोजी भारत आणि ब्रिटनच्या 14 व्या संयुक्त आर्थिक आणि व्यापार समितीची आभासी बैठक पार पडली.  वाणिज्य आणि उद्योग मंत्री  श्री पियुष गोयल आणि ब्रिटनच्या आंतरराष्ट्रीय व्यापार मंत्री  श्रीमती एलिझाबेथ ट्रस्स यांच्या सह-अध्यक्षतेखाली ही बैठक झाली.  त्यांना वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री हरदीपसिंग पुरी आणि ब्रिटनचे आंतरराष्ट्रीय व्यापार मंत्री  रानिल जयवर्धना यांनी सहकार्य केले.

मुक्त व्यापार करार आणि त्या दृष्टीने टप्प्याटप्प्याने व्यापार करार (अर्ली हार्वेस्ट डील) करण्याप्रति सामायिक कटिबद्धता गोयल आणि ट्रस्स यांनी व्यक्त केली. उभय देशांमध्ये विस्तृत चर्चेसाठी राज्यमंत्री पुरी आणि जयवर्धने यांची मासिक बैठक होणार आहे. हीच चर्चा पुढे नेण्यासाठी वाणिज्य मंत्री गोयल आणि  ट्रस्स यांच्या नेतृत्वाखाली नवी दिल्ली येथे वर्षअखेरीस  बैठक आयोजित करण्यात येईल. उभय देशांमधील संयुक्त आर्थीक आणि व्यापार समिती च्या मागील बैठकीत स्थापन झालेल्या आयुर्विज्ञान  आणि आरोग्य, अन्न व पेय यांवरील संयुक्त कार्य गट मंत्र्यांनी यावेळी त्यांच्या शिफारशी सादर केल्या.

पूर्ण सत्रांनंतर वाणिज्य आणि  उद्योग राज्यमंत्री हरदीपसिंग पुरी, ब्रिटनचे आंतरराष्ट्रीय व्यापार राज्यमंत्री  रनिल जयवर्धना आणि ब्रिटनचे गुंतवणूक राज्यमंत्री  जेरी ग्रिमस्टोन यांच्या अध्यक्षतेखाली  औपचारिक चर्चा झाली. .यावेळी त्यांनी भारतीय उद्योग महासंघाचे महासंचालक चंद्रजित बॅनर्जी आणि इंडिया यूके सीईओ फोरमचे सह-अध्यक्ष  अले पिरामल यांच्यासह उद्योजकांशी संवाद साधला.

दोन्ही देशांनी  मोकळेपणाने चर्चा केली  आणि भारत आणि ब्रिटन दरम्यान  दीर्घकालीन व्यापार आणि आर्थिक संबंधांचे पुनरुज्जीवन करण्याप्रति सामायिक वचनबद्धता व्यक्त केली.  दोन्ही देशांनी विशेषतः कोविड-19 महामारी लक्षात घेऊन आरोग्य क्षेत्रात सहकार्य करण्याचा संकल्प केला.

 

M.Iyangar/S.Kane/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1641157) Visitor Counter : 200