विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

जिनोवा बायोफार्मास्युटिकल्सच्या कोवीड–19 लस HGCO19 ला जैवतंत्रज्ञान विभागातर्फे बीज भांडवल पुरवठा

Posted On: 24 JUL 2020 3:51PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 24 जुलै 2020


वर्षअखेरपर्यंत लसीच्या वैद्यकीय चाचणीची शक्यता

Ind CEPI अंतर्गत भारत सरकारच्या जैवतंत्रज्ञान विभागातर्फे सहाय्यित आणि बीआयआरएसी तर्फे अंमलबजावणी सुरू असलेल्या लस संशोधन कार्यक्रमांतर्गत लवकरच वैद्यकीय चाचण्या सुरू होणार

 
जैव तंत्रज्ञान विभाग-BIRAC तर्फे भारतात पहिल्यांदाच एमआरएनए आधारित लस उत्पादन निर्मितीला सुरूवात झाली आहे. कोवीड–19 च्या उपचारार्थ जिनोवाच्या नोवेल स्व-प्रवर्धित एमआरएनए आधारित लसीच्या विकसनासाठी जैवतंत्रज्ञान विभागाने बीज-भांडवल पुरवठा केला आहे. 

अमेरिकेतील सियाटेल येथील एचडीटी बायोटेक कॉर्पोरेशनच्या सहकार्याने जीनोवाने ही लस (HGCO19) विकसित केली आहे. सुरक्षा, रोगप्रतिकार शक्ती आणि इतर अनुषंगिक महत्वपूर्ण बाबींची खातरजमा करण्यासाठी उंदीर आणि इतर मानवेतर प्राण्यांवर या लसीची चाचणी घेण्यात आली आहे. भारतीय नियामक मान्यतेच्या अधिन राहून या वर्षअखेरपर्यंत या लसीची मानवी चाचणी करण्यासाठी ही कंपनी अथकपणे कार्यरत आहे.

अज्ञात आणि नव्या रोगकारक जंतूंपासून उद्भवणार्‍या रोगांवर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी नवीन कल्पना विचारात घेणे आवश्यक आहे, असे मत जैवतंत्रज्ञान विभागाच्या सचिव आणि बीआयआरएसीच्या अध्यक्ष डॉ. रेणू स्वरूप यांनी या लसीविषयी बोलताना व्यक्त केले. जैवतंत्रज्ञान विभागाद्वारे सहाय्यित जिनोवाच्या एमआरएनए मध्ये न्यूक्लीय आम्ल आणि वितरण प्रणालीचा लाभ करून घेतला जातो. अतिसूक्ष्मतंत्रज्ञानाचा वापर करणारी ही लस मानवेतर प्राण्यांवर प्रभावीपणे काम करत असल्याचे दिसून आले आहे. जिनोवाची क्षमता लक्षात घेता या लसीची मानवी वैद्यकीय चाचणी उपयुक्त ठरल्यानंतर तिचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

HGCO19 विषयी

HGCO19 या लसीद्वारे कोवीड–19 संक्रमित शरीरातील पेशींना या रोगाच्या विषाणूंशी लढा देण्यास सक्षम अशी प्रतिजैवके तयार करण्यास सज्ज केले जाते, ग्राहक पेशींशी समन्वय साधण्यास सक्षम केले जाते आणि ‘lipid inorganic nanoparticle (LION)’ द्वारे सहाय्य केले जाते. 

उंदीर आणि इतर मानवेतर प्राण्यांवर या लसीची चाचणी केल्यानंतर त्यांच्या शरीरातील निष्क्रीय प्रतिजैवकांचे प्रमाण हे अमेरिकेतील बऱ्या झालेल्या रूग्णांच्या संदर्भात तेथील अन्न आणि औषध प्रशासनाने शिफारस केलेल्या 1:160 या अनुमापकापेक्षा जास्त असल्याचे दिसून आले आहे. 

एमआरएनए रचना आणि वितरण यंत्रणा या HGCO19 या लसीच्या जमेच्या बाबी आहेत. एमआरएनए रचनेमुळे ही लस दीर्घ काळ प्रतिजैवके निर्मितीसाठी पुरक ठरते तर HGCO19 मधील ‘LION delivery system’ मुळे विपरीत परिणामांची शक्यता कमी होते.

जिनोवा बद्दल

जिनोवा फार्मास्युटिकल्स मर्यादित या कंपनीचे मुख्यालय भारतात पुणे येथे आहे. ही जैवतंत्रज्ञान कंपनी असून ती विविध जीवघेण्या रोगांशी संबंधित संशोधन, विकास, उत्पादन तसेच व्यापक स्तरावर जैव-उपचार उपलब्ध करून देण्याप्रति समर्पित आहे. अधिक माहितीसाठी https://gennova.bio

अथवा संपर्क कक्ष - DBT/BIRAC येथे संपर्क साधा.

@DBTIndia@BIRAC_2012

www.dbtindia.gov.inwww.birac.nic.in


* * *

U.Ujgare/M.Pange/D.Rane
 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1640903) Visitor Counter : 239