आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
जागतिक आरोग्य संघटनेच्या सल्ल्यानुसार देशातील 19 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये प्रति दिन प्रति दशलक्ष 140 पेक्षा जास्त चाचण्या
प्रविष्टि तिथि:
21 JUL 2020 10:38PM by PIB Mumbai
कोविड - 19 च्या व्यवस्थापनासाठी “टेस्ट, ट्रॅक, ट्रीट” हे धोरण सर्वसमावेशक ठरते आहे. केंद्र सरकारच्या नेतृत्वाखाली, राज्ये / केंद्रशासित प्रदेशातील सरकारच्या विविध उपाययोजनांच्या माध्यमातून त्यावर अंमलबजावणी केली जात आहे. राज्ये / केंद्रशासित प्रदेशांनी आपापल्या कार्यक्षेत्रात चाचण्यांचे जाळे विस्तारले आहे, त्याचबरोबर जास्तीत जास्त लोकांना सहजपणे चाचण्या करता याव्यात, यासाठी अनेक उपाययोजना हाती घेतल्या आहेत. परिणामी, राष्ट्रीय स्तरावर या चाचण्यांची सरासरी प्रति दिन / प्रति दशलक्ष 180 इतकी झाली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने जारी केलेल्या "कोविड - 19 संदर्भात सार्वजनिक आरोग्य आणि सामाजिक उपाय समायोजित करण्यासाठी सार्वजनिक आरोग्याचे निकष" विषयक मार्गदर्शक सूचनांनुसार संशयित कोविड -19 प्रकरणांवर देखरेख ठेवण्याचा सल्ला दिला. प्रत्येक देशात लोकसंख्येतील प्रति दशलक्ष/प्रति दिन/ 140 चाचण्या कराव्यात, असा सल्ला जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे.
देशातील 19 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये प्रति दशलक्ष 140 पेक्षा जास्त चाचण्या केल्या जात आहेत. गोवा राज्यात दररोज सर्वाधिक म्हणजेच प्रति दिन, प्रति दशलक्ष 1333 इतक्या चाचण्या केल्या जात आहेत.
केंद्र सरकार आणि आयसीएमआरने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना चाचण्यांची संख्या वाढविण्याचा सल्ला सातत्याने दिला आहे. समन्वित प्रयत्नांच्या माध्यमातून भारतात प्रति दशलक्ष (टीपीएम) चाचण्यांची संख्या वाढून 10421 इतकी झाली आहे. यामुळे कोविड -19 संसर्गाची प्रकरणे लवकर शोधणे शक्य झाले आहे तसेच त्यांचे समयोचित आणि प्रभावी वैद्यकीय व्यवस्थापन करण्यातही मदत झाली आहे.

चाचण्यांचे प्रमाण वाढविल्यामुळे भारतात कोवीड-19 चा संसर्ग झालेल्यांच्या दरात सातत्याने घट होत असून तो सध्या 8.07% इतका आहे. भारतात अशी 30 राज्ये / केंद्रशासित प्रदेश आहेत जेथे कोवीड-19 चा संसर्ग झालेल्यांचा दर हा राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी आहे. यावरून, चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यासाठी केंद्राने घेतलेल्या पुढाकाराचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत.
कोविड-19 शी संबंधित तांत्रिक मुद्दे, मार्गदर्शक तत्वे आणि सल्ल्यांबाबत प्रमाणित आणि अद्ययावत माहितीसाठी कृपया https://www.mohfw.gov.in/ आणि @MoHFW_INDIA या संकेतस्थळांना नियमितपणे भेट द्या.
कोविड-19 शी संबंधित तांत्रिक प्रश्न technicalquery.covid19[at]gov[dot]in येथे तसेच इतर प्रश्न ncov2019[at]gov[dot]in आणि @CovidIndiaSeva येथे पाठवता येतील.
कोविड -19 शी संबंधित कोणत्याही माहितीसाठी कृपया आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या +91-11-23978046 या हेल्पलाइन क्रमांकावर किंवा 1075 (टोल फ्री) या क्रमांकावर संपर्क साधावा. राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमधील कोविड-19 संदर्भातील हेल्पलाइन क्रमांकांची यादी https://www.mohfw.gov.in/pdf/coronvavirushelplinenumber.pdf येथे उपलब्ध आहे.
****
B.Gokhale/ M.Pange/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1640409)
आगंतुक पटल : 248