रेल्वे मंत्रालय
खासगी रेल्वेगाडी प्रकल्पाबाबत अनुप्रयोग - पूर्व परिषद आज संपन्न
प्रविष्टि तिथि:
21 JUL 2020 9:56PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 जून 2020
रेल्वे मंत्रालयाने आज खासगी रेल्वेगाडी प्रकल्पाबाबत अनुप्रयोग-पूर्व (प्रि-ऍप्लिकेशन) परिषद आयोजित केली होती. सुमारे 16 संभाव्य अर्जदारांच्या सहभागाने या परिषदेला उत्तम प्रतिसाद मिळाला.
रेल्वे मंत्रालयाने प्रवासी रेल्वे सेवांच्या परिचालनात खासगी सहभागासाठी 12 पात्रता अर्ज आमंत्रित केले आहे. 109 मूळ गंतव्य जोड्याच्या मार्गावर 151 आधुनिक ट्रेन (रॅक्स) सुरू केल्या आहेत जे सध्याच्या या मार्गावरील गाड्यांव्यतिरिक्त असतील.
प्रवासी रेल्वेगाड्या चालवण्यासाठी खासगी गुंतवणूकीचा हा पहिलाच उपक्रम आहे. या प्रकल्पात खासगी क्षेत्राची सुमारे 30,000 कोटी रुपयांची गुंतवणूक होईल.
या देशातील लोकांना वाहतूक सेवांची उपलब्धता सुधारणे, आधुनिक तंत्रज्ञान युक्त गाड्या आणि प्रवाशांना सर्वांगीण प्रवासाचा अनुभव देण्याच्या दिशेने हा उपक्रम आहे. रेल्वे परिचालनातील अनेक ऑपरेटरमुळे स्पर्धा निर्माण होईल आणि सेवा सुधारतील. प्रवासी वाहतूक क्षेत्रात मागणी पुरवठा तफावत कमी करण्याच्या उद्देशानेही हा उपक्रम आहे.
निविदा प्रक्रियेचा एक भाग म्हणून, रेल्वे मंत्रालयाने 21,जुलै 2020 रोजी पहिली अनुप्रयोग -पूर्व परिषद आयोजित केली होती, ज्यात सुमारे 16 संभाव्य अर्जदारांच्या सहभागाने उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. संभाव्य अर्जदारांनी उपस्थित केलेल्या शंकांविषयी चर्चा करण्यात आली आणि आरएफक्यू आणि निविदा रुपरेषेच्या तरतुदींबाबत सुधारित स्पष्टीकरणासाठी रेल्वे मंत्रालय आणि नीती आयोगांनी स्पष्टीकरण दिले. या शंका प्रामुख्याने पात्रता निकष, निविदा प्रक्रिया, रॅक खरेदी, गाड्यांचे परिचालन आणि क्लस्टरची रचना यासंदर्भात होत्या.
निविदा अंतर्गत हाताळल्या जाणाऱ्या मार्गांवर प्रवासी वाहतुकीची माहितीही रेल्वे मंत्रालयामार्फत देण्यात येणार आहे. यामुळे निविदाकारांना प्रकल्पात त्यांची योग्य ती काळजी घेता येईल
रेल्वे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की या प्रकल्पांतर्गत चालवण्यात येणाऱ्या गाड्या खाजगी कंपन्या एकतर खरेदी करू शकतात किंवा भाड्याने घेऊ शकतात. रेल्वे मंत्रालयानेही स्पष्टीकरण दिले आहे की, रेल्वेगाडी चालविण्याबाबत जोखीम न्याय्य पद्धतीने विभागली जाईल.
संभाव्य अर्जदारांकडून आलेल्या प्रश्नांना रेल्वे मंत्रालय 31 जुलै 2020 पर्यंत लेखी उत्तरे देईल. दुसरी पूर्व-तयारी परिषद 12 ऑगस्ट 2020 रोजी होणार आहे.
* * *
B.Gokhale/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1640314)
आगंतुक पटल : 237