गृह मंत्रालय

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मेघालयमधील वेस्ट गारो हिल्स येथे पुरामुळे झालेल्या अनमोल जीवित हानीबद्दल व्यक्त केला शोक


केंद्रीय गृहमंत्र्यांनी मेघालयचे मुख्यमंत्री कॉनरड संगमा याना केंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदतीचे दिले आश्वासन

या कठीण काळात संपूर्ण देश मेघालयातील लोकांसोबत आहे- अमित शाह

प्रविष्टि तिथि: 21 JUL 2020 7:15PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 21 जून 2020

 

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मेघालयातील वेस्ट गारो हिल्समध्ये पुरामुळे झालेल्या अनमोल जीवित हानीबद्दल दुःख व्यक्त केले. केंद्रीय गृहमंत्र्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, “मी मुख्यमंत्री कॉनरेड संगमा यांच्याशी बोललो आणि त्यांना केंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.”

अमित शहा पुढे म्हणाले की, “या कठीण काळात संपूर्ण देश मेघालयातील लोकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे”.

 

 

 

* * *

B.Gokhale/S.Kane/D.Rane
 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1640247) आगंतुक पटल : 255
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Telugu , English , Urdu , हिन्दी , Manipuri , Bengali , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Malayalam