युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाची आत्मनिर्भर भारतची उद्दीष्टे साध्य करण्यासाठी 1 कोटी युवा स्वयंसेवकांचे संघटन करण्यासंदर्भात युनिसेफसोबत भागीदारी
प्रविष्टि तिथि:
20 JUL 2020 11:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 जुलै 2020
पंतप्रधानांनी दिलेल्या आत्मनिर्भर भारतच्या आव्हानाला प्रतिसाद देत, केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री किरेन रीजीजू यांचे 1 कोटी युवा स्वयंसेवकांचे संघटन करण्याचे ध्येय पूर्ण करण्यासाठी, युवा आणि क्रीडा मंत्रालयाने यु वाह (युनिसेफचा बहु-भागधारक मंच) यांच्यासोबतच्या भागीदारीवर स्वाक्षरी केली. या भागीदारीनूसार युवकांमध्ये स्वयंसेवकत्वाची भावना वाढीस लागण्यासाठी, त्यांना शिक्षण आणि उत्पादकता, कौशल्य आणि सक्रीय नागरीक होण्यासाठी कार्य केले जाणार आहे. या भागीदारी वक्तव्याचा शुभारंभ युवा व्यवहार मंत्रालयाच्या सचिव श्रीमती उषा शर्मा आणि भारतातीय युनिसेफचे प्रतिनिधी डॉ यास्मीन अली हक यांच्यामार्फत, केंद्रीय मंत्री किरेन रीजीजू यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

भागीदारीचे महत्त्व विशद करताना, किरेन रीजीजू म्हणाले, “ही भागीदारी सध्याच्या आव्हानात्मक परिस्थितीत अतिशय योग्य आहे. मला विश्वास आहे की, यात आपल्या विद्यमान धोरणांवर लक्ष केंद्रीत करता येईल. पंतप्रधानांनी युवकांसमोर स्पष्ट रोडमॅप ठेवला आहे आणि आत्मनिर्भर भारताचे आव्हान केले आहे, यासोबत भारताच्या युवकांना पुढे जायचे आहे. भारत हा विशाल लोकसंख्येचा युवा देश आहे, युवकांच्या कोणत्याही क्षेत्रातील योगदानामुळे केवळ देशातच नाही तर जागतिक व्यासपीठावरही मोठा परिणाम होईल.”

या भागीदारीमुळे भारतातील तरुणांसाठी मोठ्या प्रमाणात शिक्षण, कौशल्य आणि बेरोजगारीच्या आव्हानांवर सामोरे जाण्यासाठी उपायांची सह-निर्मिती आणि अंमलबजावणी करण्यासाठी युवकांसह कार्य करण्यासाठी मंत्रालय आणि संयुक्त राष्ट्र संघ दोघांच्या प्रयत्नांचा फायदा होईल. यात युवकांना उद्योजकतेत आधार देणे, तरुणांना प्रोत्साहन देणे, महत्वाकांक्षी सामाजिक-आर्थिक संधींशी संबंध जोडणे, तरुणांमध्ये बदल घडवून आणणे आणि नागरी सहभागास प्रोत्साहन देणे, तरुणांना करिअर मार्गदर्शन, थेट संवादाला पाठिंबा आणि अभिप्राय देणे या कामांचा समावेश असेल. युवक आणि धोरण भागधारकांमधील यंत्रणा आणि शाश्वत विकास ध्येयांसाठी एनएसएस आणि एनवायकेएस केडरची क्षमता आणि स्वयंसेवक बल वाढवणे आदींचा समावेश असेल.
M.Chopade/S.Thakur/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1640092)
आगंतुक पटल : 324