रसायन आणि खते मंत्रालय
देशभरात खतांचा पुरेसा साठा उपलब्ध आहेः गौडा
तेलंगणाचे कृषीमंत्री सिंगीरेड्डी निरंजन रेड्डी यांची केंद्रीय रसायने आणि खते मंत्री डी व्ही सदानंद गौडा यांची राज्यातील युरियाच्या उपलब्धतेसंदर्भात बैठक
प्रविष्टि तिथि:
20 JUL 2020 6:22PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 जुलै 2020
सध्याच्या खरीप हंगामात देशभरात खतांच्या मागणीत लक्षणीय वाढ झालेली असून ही गरज पूर्ण करण्यासाठी सरकार खते उत्पादक आणि राज्य सरकारे यांच्यात योग्य समन्वय राखून सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, असे केंद्रीय रसायने आणि खते मंत्री डी. व्ही सदानंद गौडा यांनी सांगितले आहे. त्याचबरोबर या मागणीची पूर्तता करण्यासाठी आयातीचा कालावधी देखील कमी करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.


तेलंगणाचे कृषीमंत्री सिंगीरेड्डी निंरजन रेड्डी यांनी आज राज्यातील युरियाच्या उपलब्धतेसंदर्भात डी व्ही सदानंद गौडा यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतली. राज्यात खतांच्या मागणीत वाढ होत आहे आणि यंदाचा मान्सून जास्त चांगला होण्याच्या अपेक्षेने शेतकऱ्यांकडून युरियाचा वापर वाढला आहे आणि गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या खरीप हंगामात लागवडीखालील क्षेत्रात वाढ झाली असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. तेलंगणामध्ये युरियाचा पुरेसा पुरवठा करण्याची विनंती त्यांनी केंद्रीय खत मंत्र्यांना केली.
सध्या देशात सर्वत्र खतांची पुरेशी उपलब्धता आहे आणि राज्यांकडे खतांचा यापूर्वीच पुरेसा साठा आहे मात्र सध्याच्या पेरण्यांच्या काळात अतिरिक्त मागणी निर्माण झाली तर त्यानुसार पुरवठ्यात वाढ केली जाईल आणि शेतकऱ्यांना युरिया उपलब्ध केला जाईल, असे आश्वासन गौडा यांनी दिले.
M.Chopade/S.Patil/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1639965)
आगंतुक पटल : 240
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam