आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड आजारातून सात लाखाहून जास्त जण बरे झाले

2.46% सहित जागतिक स्तरावर मृत्युदर सर्वात कमी असलेल्या देशांपैकी भारत एक

Posted On: 20 JUL 2020 5:44PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 20 जुलै 2020

देशात कोविड मुळे होणाऱ्या मृत्यूचा दर सतत कमी होत आहे. आता तो 2.46 टक्क्यांवर आला आहे. जागतिक स्तरावर सर्वात कमी मृत्युदर असलेल्या देशांमध्ये भारताचा क्रमांक लागतो. आधारभूत वैद्यकीय नियमावलीच्या आधारे मध्यम आणि गंभीर स्वरूपाच्या रुग्णांमध्ये उत्तमपणे राबवण्यात आलेल्या  प्रभावी वैद्यकीय व्यवस्थापना मुळे रुग्णांच्या बरे होण्याचा दर वाढत आहे. कोविड रोगाच्या उपचारांमध्ये केंद्र सरकार सर्व राज्य तसेच केंद्रशासित प्रदेशांच्या सरकारांना सतत पाठिंबा आणि मदत देत आहे. यासाठी अखिल भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेने 'e-ICU' कार्यक्रम  सुरू केला आहे. मृत्यूदर कमी करण्यासाठी आखलेल्या या कार्यक्रमाचा लाभ   अखिल भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेने देशभरातल्या अकरा राज्यातल्या 43 मोठ्या रुग्णालयांना  दिला आहे. यामध्ये अनेक  क्षेत्रांमधले वैद्यकीय तज्ञ अतिदक्षता विभागातल्या गंभीर रुग्णांच्या वैद्यकीय व्यवस्थापनासाठी सल्ला देतात. तसेच सर्व डॉक्टरांना आपापले अनुभव सांगून त्यांच्यावर चर्चा करण्याची संधी मिळते. यामुळे या रुग्णालयांची गंभीर आजारी असलेल्या रुग्णांच्या उपचाराची  क्षमता वाढली आहे.

कोविडने आजारी असलेले सात लाखाहून जास्त लोक आतापर्यंत बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडले आहे. त्यामुळे  कोविडचे सक्रीय  रुग्ण आणि बरे झालेल्या रुग्णां मधला फरक [3,09,627] वाढत चालला आहे.  22,664 रुग्ण गेल्या 24 तासात  बरे झाले आहेत. बरे होण्याचा दर सध्या 62.62 टक्के आहे.

सध्या सक्रिय असलेल्या या 3,90,459 रुग्णांना रुग्णालयात तसेच घरी असलेल्या विलगीकरण कक्षात वैद्यकीय सुविधा  पुरवल्या जात आहेत.

कोविड-19 संबंधातल्या अधिकृत आणि अद्ययावत माहितीसाठी तसेच तांत्रिक अडचणी, मार्गदर्शन आणि सूचनांसाठी कृपया नियमितपणे खालील संकेतस्थळाला भेट द्या- https://www.mohfw.gov.in/ आणि @MoHFW_INDIA.

कोविड-19 च्या संबंधात तांत्रिक शंकां निरसनासाठी  technicalquery.covid19@gov.in आणि इतर प्रश्नांसाठी ncov2019@gov.in आणि @CovidIndiaSeva.  इथे संपर्क करा.

कोविडसंबंधात कुठल्याही प्रश्नासाठी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाला खालील हेल्पलाईन नंबर वर फोन करा +91-11-23978046 or 1075 (Toll-free).

राज्यांच्या हेल्पलाईन नंबर्स ची यादी इथे पाहता येईल     https://www.mohfw.gov.in/pdf/coronvavirushelplinenumber.pdf

M.Chopade/U.Raikar/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com(Release ID: 1639947) Visitor Counter : 29