आयुष मंत्रालय
आयुष मंत्रालयाने “माय लाईफ- माय योगा” व्हिडीओ ब्लॉगिंग स्पर्धेच्या विजेत्यांची नावे घोषित केली
प्रविष्टि तिथि:
14 JUL 2020 11:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 जुलै 2020
'माय लाईफ-माय योगा' या व्हिडिओ ब्लॉगिंग स्पर्धेच्या विजेत्यांची नावे आज घोषित झाली. डिजिटल माध्यमावरील ही स्पर्धा आयुष मंत्रालय आणि 'इंडियन कौन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्स' (ICCR) यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पातळीवर घेतली गेली. पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी 6व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने 31 मे 2020 रोजी स्पर्धेची घोषणा केली.
ही स्पर्धा सहा गटात घेतली गेली; महिला आणि पुरुष ह्या दोन गटात- व्यावसायिक, वरिष्ठ (18 वर्षावरील), युवा (18 वर्षाखालील) असे तीन उपगट होते. भारतातून एकूण 35 हजार 141, तर इतर देशातून 2 हजार प्रवेशिका प्राप्त झाल्या. इतर देशातील प्रवेशिकांचे मुल्यमापन संबधित भारतीय मिशनने केले.
व्यावसायिक गटातील विजेते अश्वत्थ हेगडे (पुरुष) आणि रजनी गेहलोत (स्त्री). तर राजपाल सिंग आर्य आणि शैली प्रसाद हे वरिष्ठ गटात (18 वर्षावरील), तसेच प्रणय शर्मा आणि नव्या एस. एच. हे युवा (18 वर्षाखालील) गटात प्रथम क्रमांकाचे विजेते ठरले आहेत.
भारतातून आलेल्या प्रवेशिकांचे मुल्यमापन 200 योगतज्ज्ञांकडून करण्यात आले, व त्यातून 160 व्हिडीओ निवडले गेले. सर्व गटातील या निवडक व्हिडिओ ब्लॉगचे मुल्यमापन 15 सभासद ज्युरींनी केले. या सभासद ज्युरींनी स्वतंत्रपणे दिलेल्या गुणांच्या सरासरी गुणांवरून विजेते ठरवण्यात आले. सर्वात जास्त सरासरी गुण मिळवलेले स्पर्धक विजेते ठरले.
विजेत्यांची नावे (भारताबाहेरील स्पर्धकांमधील विजेत्यांची नावे स्वतंत्रपणे घोषित होतील.)
* * *
S.Pophale/V.Sahajrao/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1638695)
आगंतुक पटल : 218