रसायन आणि खते मंत्रालय

फार्मास्युटिकल्स विभाग तीन बल्क औषध पार्क्स आणि चार वैद्यकीय उपकरणे पार्कची ठिकाणे  निवडण्यासाठी मार्गदर्शक तत्वांना अंतिम रूप देत आहे: केंद्रीय मंत्री सदानंद गौडा


पंजाब सरकार राज्यातील बल्क ड्रग्स पार्कच्या विकासासाठी सहाय्य करण्यास इच्छुक

Posted On: 13 JUL 2020 10:22PM by PIB Mumbai

 

केंद्रीय रसायन आणि खते मंत्री डी.व्ही. सदानंद गौडा म्हणाले की औषधनिर्माण विभाग मार्गदर्शक तत्वांना अंतिम रूप देत आहे जी  देशातील आगामी तीन बल्क औषध पार्क आणि चार वैद्यकीय उपकरणे पार्कसाठी ठिकाणे निवडण्याचा आधार तयार  करतील.

पंजाबचे अर्थमंत्री  मनप्रीतसिंग बादल यांनी डी.व्ही. सदानंद गौडा यांची आज नवी दिल्ली येथे भेट घेतली आणि पंजाब राज्यातील भटिंडामध्ये प्रस्तावित बल्क ड्रग पार्क उभारण्याबाबत विचार करण्यासाठी गौडा यांना विनंती पत्र सुपूर्द केले.

 पार्कच्या विकासासाठी मदत करण्याबाबत रुची  दाखविल्याबद्दल बादल यांचे गौडा यांनी आभार मानले.

या प्रसंगी बोलताना बादल म्हणाले की, भटिंडा येथील ठिकाणी उत्तम  संपर्क व्यवस्था , पाणी व जमीन उपलब्धता असून राज्यात एनआयपीईआर, आयआयएसईआर, एम्स यासारख्या काही यूएसएफडीए मान्यताप्राप्त औषधनिर्मिती  कंपन्या आणि फार्मा संस्था आधीपासूनच अस्तित्त्वात आहेत.

महत्वपूर्ण  एपीआय / केएसएम आणि वैद्यकीय उपकरणांच्या देशांतर्गत उत्पादनाला प्रोत्साहित करण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने 12 मार्च 2020 रोजी तीन बल्क औषधे आणि चार वैद्यकीय उपकरणे पार्क विकसित करण्याच्या योजनेला मान्यता दिली असून यामध्ये केंद्र  सरकार राज्यांना प्रत्येक बल्क औषध पार्क साठी 1000 कोटी रुपये आणि  प्रत्येक वैद्यकीय उपकरणाच्या पार्क्ससाठी 100 कोटी रुपये कमाल मर्यादासह  अनुदान देईल. याव्यतिरिक्त, केंद्र  सरकारने देशभरातील प्रमुख महत्वपूर्ण  स्टार्टिंग मटेरियल / ड्रग इंटरमीडिएट्स आणि एपीआय आणि वैद्यकीय उपकरणांच्या देशांतर्गत उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजना देखील जाहीर केली आहे. या योजनांचा एकूण आर्थिक बोजा  सुमारे 13760  कोटी रुपये असेल.  बल्क औषध पार्कला चालना देणाऱ्या या योजनेमुळे बल्क औषधांचे अंदाजे 46,400  कोटी रुपयांचे वाढीव उत्पादन होणार आहे, तर वैद्यकीय उपकरण पार्कच्या योजनेमुळे सुमारे 68,437 कोटी रुपयांच्या वैद्यकीय उपकरणांचे वाढीव उत्पादन होईल. या योजनांमुळे रोजगार निर्मितीही लक्षणीयरित्या वाढेल.

 

S.Tupe/S.Kane/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1638435) Visitor Counter : 201