आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड-19 मधून बरे झालेल्यांची संख्या 5 लाखावर, सक्रीय रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या 2.31 लाखाहून अधिक


रुग्ण बरे होण्याचा दर सुमारे 63%

Posted On: 11 JUL 2020 6:40PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 11 जुलै 2020

कोविड-19 ला प्रतिबंध घालण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांनी, अनेक तत्पर आणि समन्वित उपाययोजना हाती घेतल्या. त्याच  बरोबर प्रतिबंधित क्षेत्रांची प्रभावी अंमलबजावणी, देखरेख, वेळेवर निदान आणि कोविड-19 रुग्णांसाठी प्रभावी वैद्यकीय व्यवस्थापन यांची जोड दिल्याने कोविड-19 मधून बरे झालेल्यांच्या  एकूण संख्येने आज  5 लाखाचा टप्पा ओलांडला. आतापर्यंत  5,15,385 कोविड-19  रुग्ण या आजारातून बरे झाले असून त्यांना घरी पाठवण्यात आले आहे.  कोविड-19 सक्रीय रुग्णांपेक्षा, बरे झालेल्यांची संख्या 2,31,978 ने जास्त आहे.

या वाढत्या अंतरामुळे, रुग्ण बरे होण्याच्या दरात  आणखी सुधारणा होऊन हा दर आता  62.78%. झाला आहे. गेल्या 24 तासात  19,870 रुग्ण कोरोना मुक्त झाले असून त्यांना घरी पाठवण्यात आले आहे. 2,83,407 सक्रीय रुग्ण असून हे सर्व वैद्यकीय देखरेखीखाली असून गंभीर रुग्ण, केंद्र किंवा राज्य सरकारी रुग्णालयात तर लक्षण पूर्व स्थितीत आणि मध्यम लक्षणे असणारे  गृह विलगीकरणात आहेत.

कोविड चाचणीसाठी शिफारस करण्याची  सर्व नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकांना  परवानगी देणे यासारख्या नुकत्याच केलेल्या धोरणात्मक बदलामुळे आणि आरटी-पीसीआर सह रॅपि एन्टीजिन पॉइंटऑफ केअर टेस्टिंग मुळे देशात कोविड चाचण्यांना मोठी  गती मिळाली आहे. आतापर्यंत आयसीएमआरच्या  निदानात्मक नेटवर्कखालच्या 1180 सरकारी आणि खाजगी प्रयोगशाळा मिळून 1,13,07,002 चाचण्या देशात करण्यात आल्या आहेत. सार्वजनिक क्षेत्रातल्या प्रयोगशाळाची संख्या 841 तर खाजगी प्रयोगशाळाची संख्या 339 झाली आहे. दर दिवशी होणाऱ्या चाचण्यांच्या संख्येत मोठी वाढ होत असून काल  2,82,511 चाचण्या करण्यात आल्या. सध्या देशात दहा लाख लोकसंख्येत 8193 चाचण्या होत आहेत.

  • जलद आरटी पीसीआर आधारित चाचणी प्रयोगशाळा: 620 (शासकीय: 386 + खासगी: 234)
  • ट्रू नॅट आधारित चाचणी प्रयोगशाळा: 463 (शासकीय: 420 + खाजगी: 43 )
  • सीबीएनएएटी आधारित चाचणी प्रयोगशाळा: 97 (शासकीय: 35 + खासगी: 62)

कोविड-19 शी संबंधित सर्व तांत्रिक मुद्दे, मार्गदर्शक तत्वे,आणि सल्ल्यासंबंधी अधिकृत आणि अद्ययावत माहितीसाठी कृपया येथे नियमितपणे भेट द्या :  https://www.mohfw.gov.in/ आणि @MOHFW_INDIA.

कोविड-19 शी संबंधित तांत्रिक विचारणा technicalquery.covid19[at]gov[dot]in यावर तर इतर मुद्दे ncov2019[at]gov[dot]in आणि @CovidIndiaSeva यावर पाठवू शकता.

कोविड-19 संदर्भात काही शंका असल्यास कृपया आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या + 91-11-23978046 या हेल्पलाइनवर किंवा 1075 (टोल फ्री) क्रमांकावर संपर्क साधा. कोविड-19 वरील राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या हेल्पलाइन क्रमांकाची यादी https://www.mohfw.gov.in/pdf/coronvavirushelplinenumber.pdf वर उपलब्ध आहे.

S.Tupe/N.Chitale/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1638036)