नौवहन मंत्रालय
नौवहन सहाय्यता विधेयक 2020 चा मसुदा नौवहन मंत्रालयाकडून सार्वजनिक विचार विमर्शासाठी जारी
90 वर्षे जुन्या 1927 च्या दीपगृह कायद्याची जागा घेण्याचा उद्देश
Posted On:
10 JUL 2020 2:56PM by PIB Mumbai
प्रशासनात पारदर्शकताआणि जन सहभाग वाढवण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टीकोनाला अनुसरून नौवहन मंत्रालयाने नौवहन सहाय्यता विधेयक 2020 चा मसुदा संबंधितांकडून आणि जनतेकडून सूचना मागवण्यासाठी जारी केला आहे.
हे विधेयक सुमारे नऊ दशके जुन्या दीपगृह कायदा 1927 ची जागा घेणार आहे. सागरी जलवाहतूक सहाय्य क्षेत्रात जागतिक उत्तम प्रथा, तंत्रज्ञान विकास आणि भारताचे आंतरराष्ट्रीय दायित्व समाविष्ट करण्याचा याचा उद्देश आहे.
वसाहतवाद्यांचे जुने कायदे रद्द करून त्या जागी आधुनिक आणि सागरी वाहतूक क्षेत्राच्या समकालीन आवश्यकतांकडे लक्ष पुरवणारा कायदा आणण्याच्या नौवहन मंत्रालयाच्या सक्रीय दृष्टिकोनाचा हा भाग आहे, असे केंद्रीय नौवहन राज्य मंत्री मनसुख मांडविय यांनी सांगितले. जनतेकडून आणि संबंधितांकडून आलेल्या सूचनांमुळे या कायद्याच्या तरतुदी अधिक भक्कम होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 1927 च्या दीपगृह कायद्यातल्या वैधानिक तरतुदीत गुरफटलेले सागरी नौवहन तंत्रज्ञान नियमित करण्याचा या विधेयकाचा उद्देश आहे असे त्यांनी सांगितले.
या विधेयकाच्या मसुद्यात दीपगृह आणि दीपजहाज महासंचालनालयाला अतिरिक्त अधिकार आणि कार्ये देण्यात आली आहेत. जहाज वाहतूक सेवा, प्रशिक्षण आणि प्रमाणपत्र, अपघातग्रस्त जहाजाची माहिती, भारताने स्वाक्षऱ्या केलेल्या आंतरराष्ट्रीय कराराअंतर्गत येणाऱ्या जबाबदाऱ्या चे पालन यांचा यात समावेश आहे. वारसा दीपगृह ओळखून त्याचा विकास करण्याची तरतूदही यामध्ये आहे.
या मसुद्यात गुन्ह्याबाबत नवी अनुसूची असून नौवहन सहाय्यात अडथळा आणणे, कोणत्याही प्रकारे नुकसान करणे तसेच केंद्र सरकार आणि इतर मंडळांनी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन न केल्यास दंडाची तरतूदही आहे.
आधुनिक तंत्रज्ञानामुळे सागरी नौवहन सहाय्य सुधारले असून यासंदर्भात नियमन आणि कार्यान्वयन करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या भूमिकेत मोठा बदला झाला आहे. म्हणूनच नव्या कायद्यात दीपगृहाच्या जागी नौवहनासाठी आधुनिक सहाय्यक सामग्रीच्या वापरावर भर देण्यात आला आहे.
हा मसुदा दीपगृह आणि दीपजहाज महासंचालनालयाच्या http://www.dgll.nic.in/Content/926_3_dgll.gov.in.aspx संकेत स्थळावर अपलोड करण्यात आला असून यासंदर्भात नागरिक आपल्या सूचना आणि मते 24-7- 2020 पर्यंत atonbill2020[at]gmail[dot]com वर पाठवू शकतात.
M.Chopade/N.Chitale/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1637717)
Visitor Counter : 224
Read this release in:
Telugu
,
Tamil
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Malayalam