आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

केंद्र सरकारच्या प्रयत्नांना साथ देत, कोविडचा मृत्यूदर कमी करण्यासाठी, दिल्ली एम्सच्या तज्ञ डॉक्टरांचे टेली-कम्युनिकेशन द्वारे राज्यांमधील डॉक्टरांना कोविड उपचारांविषयी मार्गदर्शन


1000 पेक्षा जास्त खाटा असलेल्या 10 रुग्णालयांचा पहिल्या फेरीत सहभाग

दर आठवड्याला मंगळवार आणि शुक्रवारी होणार टेली-कम्युनिकेशन सत्र

Posted On: 08 JUL 2020 5:39PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 8 जुलै 2020

 

कोविड-19 च्या लढ्यात सर्वसमावेशक प्रतिसाद आणि व्यवस्थापन धोरण म्हणून, केंद्र सरकार, कोविडमुळे होणारे मृत्यूदर कमी करण्यासाठी सरकार कटीबद्ध आहे. हा मृत्यूदर कमी करण्यासाठी कोविडच्या सर्व रुग्णांवर प्रभावी उपचार होणे गरजेचे आहे. यासाठी, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाने नवी दिल्लीतील एम्स रुग्णालयातल्या तज्ञ डॉक्टरांची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. हे डॉक्टर्स राज्यातल्या अतिदक्षता विभागात कार्यरत असणाऱ्या डॉक्टरांना टेली-कम्युनीकेशनच्या माध्यमातून तज्ञ सल्ला आणि मार्गदर्शन देणार आहेत. 

 कोविड-19 च्या रुग्णांवर वैद्यकीय उपचार करण्याबाबतच्या प्रोटोकॉलमध्ये टेली-सल्ला/मार्गदर्शन हा महत्वाचा घटक आहे. नवी दिल्लीतील एम्स रुग्णालयातल्या तज्ञ डॉक्टरांची टीम विविध राज्यातील रुग्णालयात अतिदक्षता विभागात कार्यरत डॉक्टरांना कोविड उपचारांबाबत मार्गदर्शन करेल. कोविडच्या रुग्णांचे मृत्यू कमी करण्यासाठी गंभीर स्थितीतील रुग्णांवर उपचारांबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.

डॉक्टरांना वेळेत तज्ञांचा सल्ला मिळावा, यासाठी सर आठवड्यात, मंगळवारी आणि शुक्रवारी असे दोन दिवस ही सत्रे होणार आहेत.

पहिले सत्र, आज दुपारी 4.30 वाजता सुरु होणार असून यात दहा रुग्णालयांची निवड करण्यात आली आहे. यात नऊ रुग्णालये मुंबईतील तर एक गोव्याचे असेल. ही रुग्णालये म्हणजे –

1.         NESCO जम्बो फॅसिलिटी, पी साउथ (Phase II);

2.        सिडको मुलुंड जंबो फॅसिलिटी – टी (Phase II);

3.        मालाड इन्फिनीटी मॉल जंबो फॅसिलिटी, पीएन (Phase III);

4.        जिओ कन्वेन्शन सेंटर, जम्बो फॅसिलिटी, एचइ (Phase III);

5.        नायर रुग्णालय;

6.        एमसीजीएम सेव्हन हिल्स;

7.        एमएमआरडीए बीकेसी  BKC जंबो फॅसिलिटी, एचई(Phase I)

8.        एमएमआरडीए बीकेसी  BKC जंबो फॅसिलिटी, एचई(Phase II);

9.        मुंबई मेट्रो दहिसर जम्बो फॅसिलिटी, T (Phase II);

10.       आणि पणजी येथील  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि  रुग्णालय

यांचा समावेश आहे

या सर्व रुग्णालयात, कोविड रूग्णांसाठी 1000 पेक्षा जास्त खाटा, अलगीकरणाच्या सुविधा ऑक्सिजन आधारित आणि अतिदक्षता सुविधायुक्त खाटा, यांची उपलब्धता आहे. आजच्या सत्रात एम्सच्या श्वसनविषयक आजार वैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख, डॉ आनंद मोहन यांचे व्याख्यान होईल.

ही टेली-कम्युनिकेशन सुविधा नंतरच्या टप्प्यात आणखी 61 रुग्णालयांपर्यंत वाढवली जाईल, ज्या रुग्णालयांमध्ये 500 ते 1000 पर्यंत खाटा आणि इतर सुविधा आहेत तिथे आठवड्यातून दोनदा हे सत्र होतील. 31 जुलैपर्यंत विविध राज्यात मार्गदर्शन करण्यासाठी या टेली-कम्युनिकेशन ची कालदर्शिका आखण्यात आली आहे. महाराष्ट्रासह एकूण 17 राज्यांत ही सत्रे होणार आहेत.  अतिदक्षता विभागात रूग्णांवर उपचार करणारे दोन डॉक्टर्स आणि संबंधित राज्यातील आरोग्य सेवांचे महासंचालक या सत्रात सहभागी होतील.

 

M.Chopade/R.Aghor/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1637267) Visitor Counter : 231