जलशक्ती मंत्रालय
परतलेल्या मजुरांना गरीब कल्याण रोजगार अभियानाअंतर्गत घरगुती नळ जोडणीच्या कामाद्वारे उपजीविकेच्या संधी
Posted On:
05 JUL 2020 4:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 जुलै 2020
संपूर्ण जग कोरोना विषाणूशी लढा देत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार या आव्हानाचे विशेषतः ग्रामीण भागासाठी उपजीविका तरतुद आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठीच्या योजना आखून संधीत परिवर्तन करत आहे. या संदर्भात 20 जून 2020 रोजी गरीब कल्याण रोजगार अभियान सुरु करण्यात आले. घरी परतलेल्या स्थलांतरित मजुरांना आणि त्यांच्याप्रमाणेच परिणाम झेलणाऱ्या ग्रामीण नागरिकांसाठी स्थानिक रोजगार निर्माण करण्यासाठी उपजीविकेच्या संधी निर्माण करण्यासाठी व्यापक सार्वजनिक कामे सुरु करण्याच्या उद्देशाने हे अभियान सुरु करण्यात आले आहे. 125 दिवस चालणाऱ्या या कालबद्ध अभियानात बिहार, झारखंड, मध्य प्रदेश, ओडिशा, राजस्थान आणि उत्तर प्रदेश या सहा राज्यांतील 27 आकांक्षी जिल्ह्यांसह 116 जिल्ह्यात लक्ष्यकेंद्री अंमलबजावणी केली जाणार आहे.
या अभियानाचा भाग म्हणून जल जीवन मिशन अंतर्गत ग्रामीण भागातल्या प्रत्येक घराला नळ जोडणी देण्याचे उद्दिष्ट ठेवले असून कुशल, अर्ध कुशल आणि परतलेल्या स्थलांतरिताना पिण्याच्या पाणी पुरवठ्यासंदर्भात मोठी संधी पुरवण्यात येत आहे. या जिल्ह्यातील गावांमध्ये काम सुरु करावे अशी विनंती राज्यांना करण्यात आली असून यामुळे घरांना पुरेशा प्रमाणात पाणी सुनिश्चित करण्याबरोबरच परतलेल्या स्थलांतरितांना रोजगार पुरवण्याठीही मदत होणार आहे. राज्यांनी सध्याच्या नळ पाणी योजनात वृद्धी करून किंवा रेट्रोफिटिंग करत सहजसाध्य कामे हाती घेण्याला प्राधान्य द्यावे असे सुचवण्यात आले आहे, ज्यामुळे ‘हर घर जल गाव’ म्हणजेच गावात 100% घरगुती नळ जोडणी देणारे गाव होईल. गरीब आणि वंचित गावात उर्वरित घरांना सध्याच्या नळ पाणी पुरवठा योजना यंत्रणेच्या रेट्रोफिटिंग द्वारे घरगुती जोडणी देण्यासाठी अमाप संधी आहे.
हे अभियान कालबद्ध आणि विशिष्ट उद्देशकेन्द्री असल्याने त्याच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी निर्धारित आखणी आवश्यक आहे. प्रत्येक गरीब कल्याण रोजगार अभियान गावात उपलब्ध करण्यात येणाऱ्या घरगुती नळ जोडणी संख्या, गावात, विभागात आणि जिल्ह्यासाठी 100 % एफएचटीसी योजनेसाठीच्या कामामुळे परतलेल्या कुशल, अर्ध कुशल, अकुशल मजुरांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. हेच या अभियानाचे फलित आणि प्रमुख कामगिरी निर्देशक असून राज्यांना याच मुद्यांवर काम करण्यासाठी सांगण्यात आले आहे. स्थानिक लोकांना प्लम्बिंग, दगड काम, विद्युत विषयक काम, पंप काम यासारख्या बाबींचे प्रशिक्षण देण्यात येत आहे ज्यामुळे त्यांना हे कौशल्यप्राप्त होऊन पाणी पुरवठ्याशी सबंधित कामासाठी कुशल मनुष्य बळ उपलब्ध होईल. याशिवाय ग्राम कृती आराखडा, ग्राम पंचायत सदस्य, ग्राम पाणी आणि स्वच्छता समिती, पाणी समिती क्षमता निर्माण इत्यादी कामे पूर्ण करण्यात येणार आहेत. या अभियानासाठी आकांक्षी जिल्ह्यांवर विशेष लक्ष देण्यात येत आहे. जल जीवन मिशन अंतर्गत पहिली आढावा बैठक या राज्यांसमवेत घेण्यात आली असून, आकांक्षी जिल्ह्यांवर विशेष लक्ष केंद्रित करत अभियानाच्या अंमलबजावणीसाठी पाक्षिक जिल्हा आणि गावनिहाय आराखडा तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
या महत्वाकांक्षी अभियानामुळे जल जीवन मिशनच्या अंमलबजावणीतून ग्रामीण जनतेला घरगुती नळ जोडणी पुरवून त्यांचे जीवनमान उंचावण्याबरोबरच ग्रामीण रोजगार निर्मिती होऊन गर्मीन अर्थव्यवस्थेला चालनाही मिळणार आहे.
S.Thakur/N.Chitale/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1636647)
Visitor Counter : 269
Read this release in:
Urdu
,
Punjabi
,
English
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam