गृह मंत्रालय

केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी एनसीआरकरीता कोविड-19 संदर्भात एकीकृत धोरणासाठी दिल्ली, हरियाणा आणि उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांसमवेत घेतली बैठक


एनसीआर मधले संसर्गाचे प्रमाण कमी होण्यासाठी रॅपिड एंटीजेन चाचण्या द्वारे आणखी चाचण्या करण्यावर लक्ष केंद्रित करण्याच्या गरजेवर दिला भर

Posted On: 02 JUL 2020 10:45PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली,  2 जुलै 2020

 

कोविड-19 संदर्भात एकीकृत धोरणासाठी  केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी दिल्ली, हरियाणा आणि उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांसमवेत आज बैठक घेतली. एनसीआर प्रदेशात संसर्ग पसरण्याचे प्रमाण कमी व्हावे यासाठी कोविड-19 संशयितांच्या व्यापक चाचण्या करण्यावर लक्ष केंद्रित करण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला.

रॅपिड एंटीजेन चाचण्या संचा द्वारे आणखी चाचण्या केल्याने जागतिक आरोग्य संघटनेने सांगितल्यानुसार संसर्ग पसरण्याचा दर 10 टक्यापेक्षा कमी राह्ण्यासाठी मदत होईल असे ते म्हणाले. या संचाद्वारे नव्वद टक्के तपसणी करणे शक्य असल्याचे त्यांनी सांगितले.उत्तर प्रदेश आणि हरियाणा सरकारच्या आवश्यकतेनुसार केंद्र सरकार हे संच उपलब्ध करून देऊ शकते असे ते म्हणाले.मानवतावादी दृष्टीकोनातून गरीबांचे जीवन वाचवणे महत्वाचेअसल्यावर भर देत मृत्यू दर कमी होण्यासाठी रुग्णांना लवकरात लवकर रुग्णालयात दाखल करण्यावर लक्ष केंद्रित करायला हवे असे त्यांनी सांगितले. एनसीआर भागात कोविड-19 मॅपिंग करण्यासाठी आरोग्य सेतू आणि इतिहास ऐपच्या व्यापक उपयोगावर त्यांनी भर दिला. दिल्लीमध्ये उपयोगात आणलेले एम्स दिल्ली टेलीमेडिसिन सल्ला मॉडेल उत्तर प्रदेश आणि हरियाणा मधेही वापरायला हवे असे त्यांनी सुचवले. एम्स दिल्ली टेलीमेडिसिन कोविड  सल्ला मॉडेलमधे उत्तर प्रदेश आणि हरियाणाही सहभागी होऊ शकतात यामुळे रुग्णांना तज्ञ डॉक्टरांचा सल्ला उपलब्ध होईल. टेलीव्हिडिओग्राफी द्वारे हरियाणा आणि उत्तर प्रदेशातल्या छोट्या रुग्णालयातल्या डॉक्टराना एम्स कडून प्र्शिक्षणही देता येईल असे ते म्हणाले.

नीती आयोगाचे सदस्य डॉ व्हि के पॉल यांनी एनसीआरमधे कोविड-19 हाताळण्याबाबतच्या रणनीती संदर्भात सादरीकरण केले. दिल्ली एनसीआर मधे स्वीकारण्यात आलेल्या उत्तम बाबी आणि यापुढची रणनीती याबाबत तपशील दिला.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ हर्ष वर्धन, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह केंद्र सरकार, उत्तर प्रदेश, दिल्ली आणि हरियाणा सरकारचे वरिष्ठ अधिकारी बैठकीला उपस्थित होते.


* * *

B.Gokhale/N.Chitale/D.Rane
 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1636100) Visitor Counter : 162