पोलाद मंत्रालय
धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली विविध मार्गांचा अवलंब करून पोलादाचा अधिकाधिक उपयोग करण्यावर चर्चा करण्यासाठी झाला वेबिनार (आभासी परिषद)
पोलादाचा उचित उपयोग वाढवून आणि पर्यावरण अनुकूल उपयोग करून विकासाला चालना देण्यासाठी ईस्पात ईर्डाची बोलाविली बैठक
पोलादाच्या वापरात वाढ होण्यावर नियमितपणे लक्ष ठेवण्यासाठी कार्यकारी संघ स्थापन करण्याची घोषणा
Posted On:
30 JUN 2020 6:18PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 जून 2020
पोलाद,पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायु मंत्री श्री.धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली "ईस्पातईर्डा : बांधकाम आणि पायाभूत सुविधा देणा-या क्षेत्रात पोलादाचा उपयोग वाढविणे " या विषयावर आज एक वेबिनार झाला. पोलादराज्यमंत्री श्री.फग्गनसिंग कुलस्ते,पोलाद मंत्रालयाचे सचिव,पोलाद मंत्रालयातील वरीष्ठ अधिकारी,या विषयातील तज्ञ, उद्योगपती, अभ्यासक,संशोधक, वापरकर्ते आणि नियामक हे देखील या बैठकीला उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्री. धर्मेंद्र प्रधान म्हणाले,की पोलाद उद्योग देशाच्या आर्थिक विकासात अत्यंत महत्वाची भूमिका बजावतो. ते पुढे म्हणाले,की सर्वात अधिक पोलाद उत्पादन करणाऱ्या देशांमध्ये भारत हा जगातील दुस-या क्रमांकाचा देश आहे,परंतु भारताचा दरडोई पोलादाचा वापर मात्र जगाच्यापेक्षा एक तृतियांश आहे ,आणि तो प्रत्यक्ष वाढविण्यासाठी आपल्याला भरपूर वाव आहे .

ईस्पातईर्डाबद्दल बोलताना ते म्हणाले,"पोलाद हा फक्त धातू नसून ती एक मानसिक स्थिती आहे,तसेच ही फक्त घोषणा नसून गरीबांचे जगणे सुसह्य व्हावे यासाठी, पर्यावरण सुधारण्यासाठी आणि उपजिवीकेच्या संधी निर्माण करून अर्थव्यवस्थेच्या मजबूतीकरणासाठी शासनाने केलेला दृढनिश्चय आहे. ईस्पातईर्डा ही सहयोगी व्यापारी मोहीम असून त्याचे लक्ष्य देशातील पोलादाचा वापर वाढविणे आणि पर्यावरण अनुकूल, किफायतशीर, मजबूत अशा पोलादाचा उचित वापर करण्यास उद्युक्त करणे हे आहे, असे ही ते पुढे म्हणाले.
श्री धर्मेंद्र प्रधान पुढे म्हणाले, की पोलादाचा वापर वाढविण्याच्या संधी आणि आव्हाने आपण ओळखिली पाहिजेत. पोलाद मंत्रालयाने याआधीच पायाभूत विभागांची मंत्रालये, राज्यसरकारे, भागिदार यांच्यासोबत पोलादाचा वापर वाढविण्यासाठी चर्चा केलीआहे. त्यांनी "मेक इन स्टील", -बांधकामात स्थित्यंतर आणून जास्त पोलादाचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. भारत रेल्वे, रस्ते, नागरी विमान वाहतूक, ऊर्जा या क्षेत्रातील पायाभूत सुविधांसाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत असून त्यामुळे पोलादाच्या वापराला गती मिळेल. पोलादाच्या अधिकाधिक वापरावर नियमितपणे लक्ष ठेवणारा कार्यकारी संघ स्थापन करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. त्यांनी सहभागी झालेल्यांना कार्यान्वित करण्याजोगया ठोस शिफारशीही देण्यास या वेबिनारमध्ये सांगितले.
श्री.फग्गन सिंग कुलस्ते आपल्या भाषणात म्हणाले,"देशात विशेष करून ग्रामीण भागात पोलादाचा वापर करण्यास भरपूर वाव आहे. ग्रामीण भागातील पोलादाचा वापर देशातील सरासरीपेक्षा एक चतुर्थांशच आहे. ते म्हणाले, की पोलादाच्या वापरामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळेल तसेच, पर्यावरण सुधारेल आणि उपजिवीकेच्या संधी निर्माण होतील. सरकारने नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर साठी पायाभूत क्षेत्राला 103 लाख कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे, यामुळे पोलादाची मागणी वाढेल असे त्यांनी सांगितले.पोलाद मंत्रालयाची इतर विभागांबरोबर पोलादाचा वापर वाढविण्यासाठी बोलणी सुरू आहेत. जपानसारख्या भूकंपग्रस्त प्रदेशात 80 टक्के पोलादाचा वापर होत असल्याचा उल्लेख करत कुलस्ते म्हणाले की पोलाद मजबूत असून स्थिरता देते. बांधकामांची किंमत कमी करण्याचे उपाय पोलाद उद्योगने शोधायला हवेत असेही त्यांनी यावेळी सांगितले.
* * *
G.Chippalkatti/S.Patgaonkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1635393)
Visitor Counter : 181