आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड-19 ची ताजी स्थिती
रुग्ण बरे होण्याचा दर आणखी सुधारून 58.67% टक्क्यांवर
कोरोनामुक्त रुग्ण आणि सक्रीय रुग्णांच्या संख्येतील तफावत 1,11,602 लाखपेक्षा अधिक
Posted On:
29 JUN 2020 5:13PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 जून 2020
कोविड-19 चे व्यवस्थापन, प्रतिबंध आणि नियंत्रण यासाठी केंद्र सरकार सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या मदतीने करत असलेल्या, सुनियोजित, पूर्वदक्षता घेऊन कालबद्ध, आणि सक्रीय प्रयत्नांचे उत्साहवर्धक परिणाम दिसत आहेत.
बरे झालेले रुग्ण आणि सक्रीय रुग्णांच्या संख्येतील तफावत आज 1,11,602 इतकी झाली आहे. एकूण 3,21,722 रुग्ण कोविड-19 मधून बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचा दर, हळूहळू वाढत असून 58.67 टक्के इतका झाला आहे.
गेल्या 24 तासांत, कोविड-19 चे एकूण 12,010 रुग्ण बरे झाले आहेत.
सध्या देशात, 2,10,120 सक्रीय रुग्णांवर वैद्यकीय देखरेखीखाली उपचार सुरु आहेत.
भारतात आता कोविड च्या निदानासाठी 1047 प्रयोगशाळा आहेत. यापैकी, 760 प्रयोगशाळा सरकारी, तर 287 खाजगी क्षेत्रात आहेत.गेल्या 24 तासात ,आणखी 11सरकारी प्रयोगशाळा कार्यरत झाल्या आहेत.
या प्रयोगशाळांची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे :--
• रियल टाईम –RT पीसीआर आधारित चाचणी प्रयोगशाळा: 567 (सरकारी: 362 + खाजगी: 205)
• TrueNat आधारित चाचणी प्रयोगशाळा: 393 (सरकारी :366 + खाजगी: 27)
• CBNAAT आधारित चाचणी प्रयोगशाळा: 87 (सरकारी: 32 + खाजगी: 55)
एकूण तपासलेल्या चाचण्यांची संख्या वाढत असून ती आता 83,98,362 पर्यंत पोचली आहे. कालच्या दिवसात एकूण 1,70,560 चाचण्या करण्यात आल्या.
कोविड19 संदर्भात कुठलीही अधिकृत आणि ताजी आकडेवारी/माहिती हवी असल्यास, तसेच काही मार्गदर्शक तत्वे अथवा सूचना बघायच्या असल्यास, कृपया खालील संकेतस्थळाला भेट द्यावी : https://www.mohfw.gov.in
तांत्रिक गोष्टींच्या माहितीसाठी संपर्क साधायचा असल्यास, या ईमेल आय डी वर साधावा: technicalquery.covid19[at]gov[dot]in आणि इतर शंका/समस्यांसाठी ईमेल आयडी- ncov2019[at]gov[dot]in आणि @CovidIndiaSeva .
कोविड-19 संदर्भात इतर माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक (हेल्पलाईन): +91-11-23978046 or 1075 (Toll-free). सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या हेल्पलाईन्सची यादी सोबत जोडली आहे. https://www.mohfw.gov.in/pdf/coronvavirushelplinenumber.pdf
M.Chopade/S.Patgaonkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1635135)
Visitor Counter : 250
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam