आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
सक्रिय रुग्णांपेक्षा बरे झालेले रुग्ण 96,000 हून अधिक
कोविड-19 रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून 58.24% वर पोहोचले
Posted On:
26 JUN 2020 4:32PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 जून 2020
कोविड-19 च्या प्रतिबंध, नियंत्रण आणि व्यवस्थापनासाठी केंद्र सरकारसह राज्य / केंद्रशासित प्रदेशांनी केलेल्या श्रेणीबद्ध, पूर्व-प्रभावी आणि कृतीशील उपाययोजनांमुळे उत्साहवर्धक परिणाम दिसत आहेत.
सक्रिय रुग्णांपेक्षा बरे झालेले रुग्ण 96,173 हून अधिक आहेत.
गेल्या 24 तासात कोविड-19 चे एकूण 13,940 रुग्ण बरे झाले त्यामुळे आत्तापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 2,85,636 झाली आहे. याद्वारे कोविड-19 रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून 58.24% वर पोहोचले आहे.
सध्या 1,89,463 सक्रिय रुग्ण असून ते सर्व सक्रिय वैद्यकीय निरीक्षणाखाली आहेत.
कोविड -19 चाचणी करण्यासाठी प्रयोगशाळांचा विस्तार करण्याच्या उद्देशाने भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने गेल्या 24 तासात 11 नवीन प्रयोगशाळा सुरु केल्या आहेत. भारतात सध्या कोविड -19 समर्पित 1016 निदान प्रयोगशाळा आहेत. यात सरकारी क्षेत्रातल्या 737 आणि 279 खाजगी प्रयोगशाळांचा समावेश आहे.
सद्य स्थिती खालीलप्रमाणे आहेः
- जलद आरटी पीसीआर आधारित चाचणी प्रयोगशाळा: 560 (सरकारी: 359 + खाजगी: 201)
- ट्रू नॅट आधारित चाचणी प्रयोगशाळा: 369 (सरकारी: 346 + खाजगी: 23)
- सीबीएनएएटी आधारित चाचणी प्रयोगशाळा: 87 (शासकीय: 32 + खाजगी: 55)
कोविड -19 च्या नमुने तपासणीची संख्याही दररोज वाढत आहे. गेल्या 24 तासात प्रयोगशाळेत 2,15,446 चाचण्या करण्यात आल्या. आजमितीस एकूण 77,76,228 नमुने तपासण्यात आले.
कोविड -19 शी संबंधित सर्व तांत्रिक मुद्यांविषयी, मार्गदर्शक तत्वांविषयी आणि सल्ल्यासंबंधी अधिकृत व अद्ययावत माहितीसाठी कृपया येथे नियमितपणे भेट द्याः https://www.mohfw.gov.in/ आणि @MOHFW_INDIA.
कोविड -19 शी संबंधित तांत्रिक प्रश्न technicalquery.covid19[at]gov[dot]in यावर तर इतर प्रश्न ncov2019[at]gov[dot]in and @CovidIndiaSeva यावर पाठवू शकता.
कोविड -19 वर काही प्रश्न असल्यास कृपया आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाशी संपर्क साधा : + 91-11-23978046 या हेल्पलाइनवर किंवा 1075 (टोल फ्री) क्रमांकावर. कोविड -19 वरील राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या हेल्पलाइन क्रमांकाची यादी देखील https://www.mohfw.gov.in/pdf/coronvavirushelplinenumber.pdf यावर उपलब्ध आहे.
S.Tupe/V.Joshi/P.Malandkar
S.Tupe/V.Joshi/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1634526)
Visitor Counter : 238
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam