आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड-19 सद्यस्थिती


कोविड-19 विरुद्धच्या लढ्यात केंद्र सरकारने ईशान्येकडील राज्यांना दिला मदतीचा हात

Posted On: 26 JUN 2020 3:14PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 26 जून 2020

देशभरात कोविड-19 महामारीविरुद्धचा लढा एकत्रित प्रयत्नाच्या रुपात अखंड सुरु आहे. कोविड -19 विरुद्धच्या लढ्यात ईशान्येकडील राज्यातील वैद्यकीय सेवेच्या पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणासाठी केंद्र  सरकारने सक्रियपणे आणि जोरदार समर्थन दिले आहे

ईशान्येकडील (एनई) राज्यांत देशाच्या तुलनेत कोविड -19 रुग्णांचे प्रमाण कमी आहे. खाली दिलेल्या तक्त्यानुसार, आजमितीस सक्रिय रुग्ण 3731 आहेत, तर बरे झालेले रुग्ण त्यांच्यापेक्षा जास्त म्हणजे  5715 आहेत. मृत्यू दर सातत्याने कमी असून मणिपूर, मिझोरम, नागालँड आणि सिक्कीममध्ये मृत्यूची नोंद नाही.

अनु क्रमांक

राज्य

सक्रिय रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

1

अरुणाचल प्रदेश

121

38

1

2

आसाम

2279

4033

9

3

मणिपूर

702

354

0

4

मेघालय

3

42

1

5

मिझोरम

115

30

0

6

नागालँड

195

160

0

7

सिक्कीम

46

39

0

8

त्रिपुरा

270

1019

1

एकूण

 

3731

5715

12

 

ईशान्येकडील राज्यातील कोविड -19 चा प्रसार रोखण्याच्या प्रयत्नातील मोठा अडसर होता तो म्हणजे चाचणी सुविधांचा पूर्णतः अभाव. परंतु, आज आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत केंद्र सरकारने लक्ष केंद्रित केल्यामुळे, ईशान्येकडील राज्यात सार्वजनिक क्षेत्रातील 39 आणि खाजगी क्षेत्रात तीन चाचणी प्रयोगशाळा मिळून एकूण 42 प्रयोगशाळा आहेत.

अनु क्रमांक

राज्य

सार्वजनिक क्षेत्रातील प्रयोगशाळा

खाजगी क्षेत्रातील प्रयोगशाळा

एकूण प्रयोगशाळा

1

अरुणाचल प्रदेश

3

0

3

2

आसाम

10

2

12

3

मणिपूर

2

0

2

4

मेघालय

6

1

7

5

मिझोरम

2

0

2

6

नागालँड

13

0

13

7

सिक्कीम

2

0

2

8

त्रिपुरा

1

0

1

एकूण

 

39

3

42

 

ईशान्येकडील राज्यांना कोविड समर्पित रुग्णालये, कोविड आरोग्य केंद्रे आणि कोविड सेवा केंद्रांच्या तीव्र अभावामुळे अडचणींचा सामना करावा लागला. केंद्राच्या मदतीने ईशान्येकडील सर्व राज्यांमधील आरोग्य सेवा मूलभूत सुविधांना पूरक मदत करण्यात आली आहे.

सद्यस्थिती खालीलप्रमाणे हे-

अनु क्रमांक

राज्य

समर्पित कोविड रुग्णालये / डीसीएच

समर्पित कोविड आरोग्य केंद्र / डीसीएचसी

समर्पित कोविड केंद्र / डीसीसीसी

सुविधेची संख्या

1

अरुणाचल प्रदेश

4

31

51

86

2

आसाम

32

267

1001

1300

3

मणिपूर

2

18

1

21

4

मेघालय

7

24

14

45

5

मिझोरम

1

15

15

31

6

नागालँड

12

1

1

14

7

सिक्कीम

1

2

2

5

8

त्रिपुरा

1

2

13

16

एकूण

 

60

360

1098

1518

 

तसेच,अतिदक्षता खाटा, विलगीकरण खाटा, ऑक्सिजन समर्थित खाटा आणि व्हेंटिलेटरची संख्या वाढविण्यासाठी भारत सरकारने ईशान्येकडील राज्यांना पाठिंबा दर्शविला आहे. कोविड -19 रुग्णांच्या  प्रभावी रुग्णालयीन व्यवस्थापनात याने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

अनु क्रमांक

राज्य

एकूण  विलगीकरण  खाटा (अतिदक्षता खाटा वगळून)

ऑक्सिजन समर्थित खाटा

एकूण अतिदक्षता खाटा

व्हेंटिलेटरची संख्या

1

अरुणाचल प्रदेश

1998

178

60

16

2

आसाम

67833

1841

598

350

3

मणिपूर

829

317

48

45

4

मेघालय

1231

345

83

95

5

मिझोरम

709

213

37

27

6

नागालँड

681

142

54

28

7

सिक्कीम

251

224

20

59

8

त्रिपुरा

1277

10

13

7

 

एन 95 मास्क, पीपीई किट आणि हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन गोळ्यांची उपलब्धता वाढविण्यासाठी केंद्राने ईशान्येकडील राज्यांना जोरदार पाठिंबा दर्शविला आहे.

अनु क्रमांक

राज्य/केंद्रशासित प्रदेश/केंद्रशासित संस्था 

एन 95 मास्क वितरण (लाख)

पीपीई किट वितरण (लाख)

हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन गोळ्यांचे वितरण (लाख)

1

अरुणाचल प्रदेश

1.21

0.66

1.5

2

आसाम

3.37

2.01

6.7

3

मणिपूर

0.95

0.79

2.7

4

मेघालय

0.75

0.52

1.75

5

मिझोरम

0.76

0.31

2.2

6

नागालँड

0.7

0.25

1.75

7

सिक्कीम

0.80

0.52

0.25

8

त्रिपुरा

1.38

1.13

2.5

 

S.Tupe/V.Joshi/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1634485) Visitor Counter : 247