नौवहन मंत्रालय

‘ड्रेजिंग’सामुग्री फेरवापराच्या शक्यतांचा शोध घेण्याचे मंत्री मांडवीय यांचे आवाहन


भारताच्या यशोगाथेमध्ये शाश्वत विकासाच्या उद्देशाने 'कचऱ्यातून संपत्ती’ निर्माण करण्यासाठी सरकारचे प्रयत्न - मनसुख मांडवीय

Posted On: 24 JUN 2020 4:32PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 24 जून 2020


नौवहन राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) मनसुख मांडवीय यांनी आज नौवहन मंत्रालय, भारतीय नौवहन महामंडळ, ‘ड्रेजिंग’ महामंडळ, भारतीय बंदर संघटना, भारतीय अंतर्गत जलमार्ग प्राधिकरण, प्रमुख बंदरांचे अध्यक्ष व अधिकारी, तसेच या क्षेत्रातल्या तज्ज्ञांबरोबर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून 'ड्रेजिंग' सामुग्रीच्या फेरवापराविषयी चर्चा केली. समुद्र व इतर मोठ्या जलाशयांमध्ये तयार होणारी कुंभी, पर्णी तसेच पाण्याच्या तळाशी बसलेला गाळ यांना ‘ड्रेजिंग’ असे म्हणतात. या जलपर्णीचा व गाळाचा फेरवापर करण्याविषयी आज नौवहन मंत्र्यांनी चर्चा केली. 

‘ड्रेजिंग’ महामंडळाने किनारपट्टीवर तसेच देशातल्या नदीकाठच्या बंदरावर ‘ड्रेजिंग’ सामुग्रीचा फेरवापर करण्यासाठी असलेल्या शक्यतांचा शोध घ्यावा, असे निर्देश मंत्री मांडवीय यांनी दिले. जलाशयामध्ये उत्पन्न झालेली पर्णी, केंदाळ व तळाशी बसलेला गाळ यांचा फेरवापर करता आला तर, हे काढण्यासाठी लागणाऱ्या खर्चात बचत होऊ शकणार आहे. जलवाहतूक सुरक्षित व्हावी व कोणत्याही अडथळ्याविना जलप्रवास शक्य व्हावा, यासाठी पाण्यात वाढणारी  जलकुंभी, तसेच पाण्यातला गाळ वारंवार काढून टाकावा लागतो; हे लक्षात घेऊन पर्यावरणपूरक पद्धतीने व गाळाच्या वाहतुकीचा खर्च टाळण्यासाठी ‘ड्रेजिंग’ सामुग्रीचा फेरवापर करण्याचे मॉडेल तयार करण्याची सूचना मनसुख मांडवीय यांनी यावेळी केली. 

भारत सरकारने शाश्वत विकासाचे लक्ष्य निश्चित केले आहे. त्यानुसार कचऱ्याचे पर्यावरणाला अनुकूल रूपांतर केले तर ‘कचऱ्यातून संपत्ती’ या संकल्पनेला बळकटी मिळणार आहे.


* * *

S.Pophale/S.Bedekar/D.Rane
 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1633909) Visitor Counter : 188