विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

सीएसआयआर-नीरी येथे झाल्या 3000 पेक्षा जास्त कोविड-19 नमुना चाचण्या

Posted On: 24 JUN 2020 3:34PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 24 जून 2020


सीएसआयआर-नीरी (वैज्ञानिक आणि औद्योगिक अनुसंधान परिषद-राष्ट्रीय पर्यावरण तंत्रज्ञान संशोधन संस्था) येथे एप्रिल 2020 पासून कोविड-19चे नमुने तपासण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. आतापर्यंत त्यांनी कोविड-19च्या अशा 3000 पेक्षा जास्त तपासणी चाचण्या केल्या आहेत.

सीएसआयआर-नीरी येथे दिवसाला 50 नमुने तपासण्यासाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध आहेत. चाचण्या करण्यापूर्वी जैवसंरक्षण व जैवसुरक्षिततेची योग्य ती  खबरदारी  येथे घेतली जाते. या चाचण्या उपलब्ध करण्यापूर्वी कायद्याने बंधनकारक असलेल्या आवश्यक त्या सर्व मान्यता प्राप्त केल्या गेल्या, असे सीएसएसआर - नीरीचे संचालक डॉ राकेशकुमार म्हणाले.

ही सुविधा नागपूर आणि विदर्भातील आसपासच्या विभागांसाठी (परिसरासाठी) उपलब्ध आहे. कोविड-19चे नमुने तपासणी चाचण्यांव्यतिरिक्त, आरोग्य कर्मचाऱ्यांना रूग्णांची सेवा करताना कोणत्याही प्रकारे या विषाणूचा संसर्ग होऊ नये, यासाठी वैयक्तिक संरक्षक साधने (पर्सनल प्रोटेक्टीव्ह इक्विपमेंट- पीपीई) देखील  सीएसआयआर - नीरीकडून  दिली जात आहेत, असे सीएसआयआर - नीरी  येथील वैज्ञानिक डॉ प्रकाश कुंभारे यांनी सांगितले.

सीएसआयआर - नीरी येथील विषाणूशास्त्र प्रयोगशाळेत कोविड-19 विषाणू चाचणी

 

सीएसआयआर - नीरीच्या विषाणूशास्त्र प्रयोगशाळेतील पथक कोविड-19 चाचणी करताना


* * *

S.Pophale/S.Patgaonkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1633887) Visitor Counter : 207