गृह मंत्रालय
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नागरिकांना दिल्या जगन्नाथ रथ यात्रेच्या शुभेच्छा
“पवित्र जगन्नाथ रथ यात्रेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा”- केंद्रीय गृहमंत्री
“महाप्रभू जगन्नाथ सगळ्यांना उत्तम आरोग्य, आनंद आणि भरभराट प्रदान करो”-अमित शहा
“भगवान जाग्न्नाथानांचा आशीर्वाद सर्वांना असाच लाभत राहू दे आणि देशाला लवकरच कोरोना साथीच्या आजारापासून मुक्त करू दे. जय जगन्नाथ”- अमित शहा
Posted On:
23 JUN 2020 2:43PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 जून 2020
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नागरिकांना जगन्नाथ रथ यात्रेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की, “पवित्र जगन्नाथ रथ यात्रेच्या मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. महाप्रभू जगन्नाथ सगळ्यांना उत्तम आरोग्य, आनंद आणि भरभराट प्रदान करो. भगवान जाग्न्नाथानांचा आशीर्वाद सर्वांना असाच लाभत राहू दे आणि देशाला लवकरच कोरोना साथीच्या आजारापासून मुक्त करू दे. जय जगन्नाथ”
पुरी रथयात्रेला परवानगी देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे केंद्रीय गृहमंत्र्यांनी काल स्वागत केले. अमित शहा म्हणाले की रथ यात्रेस सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिल्याने संपूर्ण देशात उत्साह व आनंदाचे वातावरण आहे. केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवळ कोट्यावधी भाविकांच्या भावना समजून घेतल्या नाहीत तर आपल्या देशातील ही मोठी परंपरा अबाधित राहण्यासाठी त्यावर सल्लामसलत करून सकारात्मक तोडगा देखील काढला. यामुळे ते आणि कोट्यावधी भाविक आनंदी झाले आहेत.
B.Gokhale/S.Mhatre/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1633604)
Visitor Counter : 141