निती आयोग
कार्बनमुक्त वाहतूक: भारतासाठी कमी कार्बनडाय ऑक्साईड उत्सर्जन मार्ग विकसित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय प्रकल्प
Posted On:
22 JUN 2020 4:32PM by PIB Mumbai
आंतरराष्ट्रीय वाहतूक मंच (आयटीएफ) च्या सहकार्याने नीती आयोग 24 जून रोजी “भारतात कार्बनमुक्त वाहतूक” हा प्रकल्प सुरु करणार आहे. भारतासाठी कमी कार्बन उत्सर्जन करणारी वाहतूक व्यवस्था मार्ग विकसित करणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे.
भारत 2008 पासूनच, वाहतूक धोरण तयार करणाऱ्या आंतर-सरकारी संघटना असणाऱ्या आयटीएफ चा सदस्य आहे.
आयटीएफचे सरचिटणीस यंग ता किम आणि नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत या कार्यक्रमाचे ऑनलाईन उद्घाटन करतील. गृहनिर्माण आणि शहरी कामकाज मंत्रालय, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय आणि आयटीएफचे वरिष्ठ अधिकारीही या कार्यक्रमला उपस्थित असतील.
या ऑनलाईन कार्यक्रमाच्या माध्यमातून भारतातील वाहतूक आणि हवामान बदल विषयातील हितधारकांना या नियोजित प्रकल्पातील उपक्रमांची माहिती दिली जाईल. हा कार्यक्रम भारताच्या वाहतुकीशी निगडीत आव्हाने आणि कार्बनडाय ऑक्साईड कमी करण्याच्या महत्वाकांक्षेशी ती कशाप्रकारे संबंधित आहे याची माहिती प्रदान करण्याची संधी देखील देईल. या चर्चेमुळे प्रकल्पाला भारताच्या विशिष्ट गरजा व परिस्थितीवर अधिक लक्ष केंद्रित करण्यास मदत होईल.
“भारतात कार्बनमुक्त वाहतूक” हा प्रकल्प भारतासाठी त्याच्या आवश्यकतेनुसार वाहतूक उत्सर्जन मुल्यांकन आराखडा तयार करेल. हे सरकारला सध्याच्या आणि भविष्यातील वाहतूक उपक्रमांची विस्तृत माहिती आणि त्यांच्या निर्णय घेण्याच्या आधारावर कार्बनडाय ऑक्साईड उत्सर्जनाशी संबंधित माहिती प्रदान करेल.
काय: “भारतात कार्बनमुक्त वाहतूक” चा शुभारंभ
केंव्हा: बुधवारी, 24 जून 17:00–19:00 भारतीय प्रमाणित वेळ
कुठे: https://youtu.be/l2G5x5RdBUM युट्युबवर थेट प्रक्षेपण
“भारतात कार्बनमुक्त वाहतूक” आंतरराष्ट्रीय वाहतूक मंचच्या उपक्रमाच्या व्यापक स्तरावर भारतात राबवला जाईल. हा प्रकल्प “उदयोन्मुख अर्थव्यवस्थेतील कार्बनमुक्त वाहतूक” (डीटीईई) या प्रकल्प समूहाचा एक भाग आहे, जो जगभरातील विविध क्षेत्रांमधील वाहतूक कार्बनमुक्त करण्याला समर्थन देते. भारत, अर्जेन्टीना, अझरबैजान आणि मोरोक्को सध्याचे सहभागी देश आहेत. ही परियोजना आयटीएफ आणि वुप्परटल संस्था आणि जर्मनीच्या पर्यावरण, निसर्ग संरक्षण आणि अणु ऊर्जा संस्थेचा एकत्रित प्रकल्प आहे.
*****
S.Thakur/S.Mhatre/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1633327)
Visitor Counter : 252