अल्पसंख्यांक मंत्रालय
केंद्रीय अल्पसंख्यांक व्यवहार मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी आपल्या निवासस्थानी विविध समाजाच्या निवडक लोकांबरोबर योगासने करून सहावा आंतरराष्ट्रीय योगदिन केला साजरा
Posted On:
21 JUN 2020 4:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 जून 2020
केंद्रीय अल्पसंख्यांक व्यवहार मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी आपल्या निवासस्थानी विविध समाजाच्या निवडक लोकांबरोबर योगासने करून सहावा आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा केला.
संपूर्ण देशभरामध्ये कोविड-19 महामारीचा उद्रेक लक्षात घेवून मोठ्या संख्येने एकत्रित जमून कोणताही कार्यक्रम साजरा करण्यावर निर्बंध आहेत. त्यामुळे यंदा आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करण्यासाठी आपआपल्या घरामध्येच ‘योग विथ फॅमिली’ अशी संकल्पना निश्चित करण्यात आली.
इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल माध्यमांव्दारे संपूर्ण देशभर अतिशय उत्साहामध्ये योगदिन आज साजरा करण्यात आला. अनेक लोकांना योग कार्यक्रमांमध्ये ‘ऑनलाईन’ सहभागी होण्यासाठी सुविधा केली गेली होती. सरकारने सामजिक आणि डिजिटल माध्यमांचा योगदिवसाच्या कार्यक्रमांसाठी जास्तीत जास्त उपयोग केला.
केंद्रीय अल्पसंख्यांक व्यवहार मंत्री नक्वी स्वतः गेली कित्येक वर्षे योगाभ्यास करीत आहेत. योगासनांमुळे सर्व वयोगटातल्या लोकांना लाभ होतो. आत्ताच्या काळात योग म्हणजे संपूर्ण जगाच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. त्याचा भारतीय म्हणून सर्वांना गर्व वाटला पाहिजे. भारताची हजारो वर्षांपासून परंपरा, जीवनशैली, प्राचीन संस्कृती आरोग्यदायी आहे तसेच सर्वांचे कल्याण करणारी आहे, हे आता संपूर्ण जगाला पटले आहे, योग हा आरोग्याचा स्त्रोत आहे, हे आता संपूर्ण जगाला पटले आहे. असे मनोगत नक्वी यांनी व्यक्त केले.
योगमुळे माणसाचे मन आणि शरीर सुदृढ राहते त्यामुळे बाहेरचे ताणतणाव आणि प्रदूषण यांचे दुष्परिणाम होत नाहीत. योग म्हणजे ‘उत्तम आरोग्याची सोन्याची किल्ली’ आहे, आणि ‘उत्तम आरोग्य हीच खरी संपत्ती’ आहे, असेही नक्वी यावेळी म्हणाले.
(केंद्रीय अल्पसंख्यांक व्यवहार मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी आपल्या नवी दिल्लीतल्या निवासस्थानी आंतरराष्ट्रीय योग दिनी विविध समुदायातल्या निवडक लोकांबरोबर योगासने केली, त्याची छायाचित्रे)
* * *
G.Chippalkatti/S.Bedekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1633171)
Visitor Counter : 270