अर्थ मंत्रालय

प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज-आतापर्यंतची प्रगती


प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेजअंतर्गत 42 कोटीहून अधिक गरीब लोकांना 65,454 कोटी रुपयांचे वित्तीय सहाय्य प्राप्त

Posted On: 20 JUN 2020 6:05PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 20 जून 2020

प्रधान मंत्री गरीब कल्याण पॅकेजचा भाग म्हणून केंद्र सरकारने महिला, गरीब जेष्ठ नागरिक आणि शेतकऱ्यांना 1.70 लाख कोटी रुपयांच्या मोफत अन्नधान्य आणि आर्थिक मदत जाहीर केली. या योजनेच्या जलदगती अंमलबजावणीवर केंद्र आणि राज्य सरकार सातत्याने लक्ष ठेवून आहेत. प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेजअंतर्गत 42 कोटीहून अधिक गरीब लोकांना 65,454 कोटी रुपयांचे वित्तीय सहाय्य प्राप्त झाले आहे.

प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेजच्या विविध घटकाअंतर्गत साध्य केलेली प्रगती याप्रमाणे- 

पीएम-किसानच्या पहिल्या हप्त्यापोटी 8.94 कोटी लाभार्थींना 17,891 कोटी  रुपयांचे वाटप  

20.65 कोटी (100टक्के) महिला जन धन खातेधारकांच्या खात्यात पहिला हप्ता म्हणून 10,325 कोटी जमा. दुसरा हप्ता म्हणून 20.62 कोटी (100टक्के)महिला जन धन  खातेधारकांच्या खात्यात 10,315 कोटी रुपये जमा. तिसरा हप्ता म्हणून 20.62 कोटी (100टक्के)महिला जन धन  खातेधारकांच्या खात्यात 10,312  कोटी रुपये जमा.

वरिष्ठ नागरिक, विधवा आणि दिव्यांग असलेल्या 2.81 कोटी लोकांना दोन हप्त्यात एकूण 2814.5 कोटी रुपये वितरीत करण्यात आले. सर्व 2.81 कोटी लाभार्थींना दोन हप्त्यात लाभ हस्तांतरित करण्यात आले.

2.3 कोटी बांधकाम मजुरांना 4312.82 कोटी रुपयांचे वित्तीय सहाय्य प्राप्त झाले.

आतापर्यंत एप्रिलसाठी 36 राज्ये/केंद्रशासित प्र्देशानी, 113 लाख मेट्रिक टन अन्नधान्याची उचल केली आहे. एप्रिल2020 साठी 36 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांनी 74.03 कोटी लाभार्थींना 37.01 एलएमटी अन्नधान्य वितरीत केले आहे. मे 2020 साठी 36 राज्ये/केंद्रशासित प्र्देशानी 72.83 कोटी लाभार्थींना 36.42  एलएमटी अन्नधान्य वितरीत केले आहे. जून 2020 साठी 29  राज्ये/केंद्रशासित प्र्देशानी27.18 कोटी लाभार्थींना 13.59  एलएमटी अन्नधान्य वितरीत केले आहे. तीन महिन्यासाठी निर्धारित 5.8 एलएमटी डाळींपैकी 5.68 एलएमटी डाळी विविध राज्ये /केंद्रशासित प्रदेशांना पाठवण्यात आल्या. 19.4 कोटीपैकी 16.3 कोटी कुटुंब लाभार्थींना 3.35 एलएमटी डाळी वितरीत करण्यात आल्या. 28 राज्ये /केंद्रशासित प्रदेशांनी एप्रील्साठी डाळींचे 100 टक्के वितरण पूर्ण केले तर 20 राज्ये /केंद्रशासित प्रदेशांनी मे साठी डाळींचे 100 टक्के वितरण पूर्ण  केले तर 7 राज्ये /केंद्रशासित प्रदेशांनी जूनसाठी डाळींचे 100 टक्के वितरण पूर्ण  केले.

आत्मनिर्भर भारत अंतर्गत केंद्र सरकारने स्थलांतरितासाठी दोन महिन्यांसाठी मोफत धान्य आणि चणा वाटप जाहीर केले.19 जून 2020 पर्यंत 36 राज्ये/केंद्रशासित प्र्देशानी 6.3 एलएमटी धान्याची उचल केली आणि 34,074 मेट्रिक टन  चणा राज्ये/केंद्रशासित प्र्देशाना योजनेअंतर्गत पाठवण्यात आला.

एकूण 8.52 कोटी पीएमयुवाय सिलेंडरची योजनेअंतर्गत एप्रिल आणि मे 2020 साठी  नोंदणी करण्यात आली आणि त्यांचे वितरणही झाले. जून 2020 साठी  2.1 कोटी पीएमयुवाय सिलेंडरची नोंदणी करण्यात आली आणि 1.87  कोटी पीएमयुवाय सिलेंडरचे लाभार्थींना मोफत  वितरणही झाले.

ईपीएफओच्या 20.22 लाख सदस्यांनी परत न करण्याचा एडव्हान्स म्हणून ऑनलाईन रक्कम काढण्याचा लाभ घेत ईपीएफओ खात्यातून 5767 कोटी रुपयांचा लाभ घेतला.

1 एप्रिल 2020 पासून वाढीव दर अधिसूचित करण्यात आले. चालू वित्तीय वर्षात  88.73 कोटी मानव दिवस कामाची निर्मिती करण्यात आली. मजुरी आणि साहित्य यांची प्रलंबित देणी भागवण्यासाठी  36,379 कोटी रुपये राज्यांना जारी करण्यात आले. 

65.74 लाख कर्मचाऱ्यांच्या खात्यात 24% ईपीएफ योगदानापोटी  996. 46 कोटी रुपये  हस्तांतरित करण्यात आले.

डीएमएफ अंतर्गत राज्यांना 30टक्के निधी म्हणजे 3,787 कोटी रुपये खर्च करण्यास सांगण्यात आले असून आतापर्यंत 183.65 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.

30 मार्च 2020 पासून सरकारी रुग्णालये आणि आरोग्य सेवा केंद्रात आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी विमा योजना कार्यान्वित करण्यात आली. न्यू इंडिया एश्युरन्स या योजनेची अंमलबजावणी करत आहे. या योजनेला सप्टेंबर पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे.

प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज एकूण

थेट लाभ हस्तांतरण 19-6-2020 पर्यंत

योजना

लाभार्थी

रक्कम

पीएमजेडीवाय महिला खातेधारकांना  सहाय्य

पहिला हप्ता - 20.65 कोटी (100टक्के)

दुसरा हप्ता-20.63 कोटी

तिसरा हप्ता -20.62 (100टक्के)

पहिला हप्ता  –10,325 कोटी

दुसरा हप्ता – 10,315 कोटी

तिसरा हप्ता –10,312 कोटी

एनएसएपी (वृद्ध विधवा,दिव्यांग, जेष्ठ नागरीक ) यांना सहाय्य

2.81 Cr (100%)

2814 कोटी

पीएम –किसान अंतर्गत शेतकऱ्यांना देण्यात आलेली  रक्कम

8.94 Cr

17891 कोटी

इमारत आणि इतर बांधकाम मजुरांना सहाय्य

2.3 Cr

4313 कोटी

ईपीएफओ साठी 24 टक्के योगदान

.66 Cr

996 कोटी

उज्वला

पहिला हप्ता – 7.48

दुसरा हप्ता – 4.48

8488 Cr

एकूण

42.84 Cr

65,454 कोटी

 

  

G.Chippalkatti/N.Chitale/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1632957) Visitor Counter : 379