आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड-19 सद्यस्थिती


कोविड-19 मधून बरे झालेल्यांची संख्या 2,13,830 वर पोहोचली

रुग्ण बरे होण्याचा दर 54.13% पर्यंत वाढला

Posted On: 20 JUN 2020 4:16PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 20 जून 2020

 

गेल्या 24 तासात कोविड-19 चे 9,120 रुग्ण बरे झाल्यामुळे आत्तापर्यंत एकूण 2,13,830 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचा दर 54.13% पर्यंत पोहोचला आहे.

सध्या संक्रमित रुग्णांची संख्या 1,68,269 असून ते सर्व सक्रिय वैद्यकीय निरीक्षणाखाली आहेत.

शासकीय प्रयोगशाळांची संख्या 715 पर्यंत तर खाजगी प्रयोगशाळांची संख्या 259 पर्यंत वाढली आहे (एकूण 974 प्रयोगशाळा). वर्गवारी खालीलप्रमाणे:

जलद आरटी पीसीआर आधारित चाचणी प्रयोगशाळा: 543 (शासकीय: 350 + खाजगी: 193)

ट्रू नॅट आधारित चाचणी प्रयोगशाळा: 356 (शासकीय: 338 + खाजगी: 18)

सीबीएनएएटी आधारित चाचणी प्रयोगशाळा: 75 (शासकीय: 27 + खाजगी: 48)

गेल्या 24 तासात 1,89,869 नमुने तपासण्यात आले. त्यामुळे आत्तापर्यंत 66,16,496 नमुने तपासण्यात आले.

कोविड -19 शी संबंधित सर्व  तांत्रिक मुद्द्यांविषयी, मार्गदर्शक तत्वांविषयी आणि सल्ल्यासंबंधी अधिकृत व अद्ययावत माहितीसाठी कृपया येथे नियमितपणे भेट द्या:- https://www.mohfw.gov.in/ आणि @MOHFW_INDIA.

कोविड -19 शी संबंधित तांत्रिक प्रश्न technicalquery.covid19[at]gov[dot]in यावर तर इतर प्रश्न ncov2019[at]gov[dot]in and @CovidIndiaSeva यावर पाठवू शकता.

कोविड -19 वर काही प्रश्न असल्यास कृपया आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाशी संपर्क साधा : + 91-11-23978046 या हेल्पलाइनवर किंवा 1075 (टोल फ्री) क्रमांकावर. कोविड -19 वरील राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या हेल्पलाइन क्रमांकाची यादी देखील https://www.mohfw.gov.in/pdf/coronvavirushelplinenumber.pdf .यावर उपलब्ध आहे.

 

S.Pophale/V.Joshi/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1632895) Visitor Counter : 243