संरक्षण मंत्रालय
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संरक्षण दलांचे प्रमुख आणि तिन्ही सेना दल प्रमुखांबरोबर लडाख सीमेवरील परिस्थितीचा घेतला आढावा
Posted On:
17 JUN 2020 4:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 जून 2020
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज सकाळी साऊथ ब्लॉक, नवी दिल्ली येथे झालेल्या बैठकीत लडाख सीमेवरील परिस्थितीचा आढावा घेतला. या बैठकीला संरक्षण दलांचे प्रमुख आणि लष्करी कामकाज विभागाचे सचिव जनरल बिपिन रावत, लष्करप्रमुख जनरल एम. एम. नरवणे, नौदल प्रमुख ऍडमिरल करमबीर सिंह आणि हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल आर. के. एस. भदौरिया उपस्थित होते.
राजनाथ सिंह यांनी एका ट्विटद्वारे दिलेल्या संदेशात सीमेवरील संघर्षात झालेल्या जीवितहानीबद्दल दुःख व्यक्त केले.
ते म्हणाले, “गलवानमध्ये सैनिक शहीद होणे, हे फारच क्लेशदायक आणि वेदनादायक आहे. आपल्या सैनिकांनी कर्तव्य बजावताना अतुलनीय शौर्य व पराक्रम दाखवला आणि भारतीय सैन्याच्या सर्वोच्च परंपरेत आपल्या प्राणांचे बलिदान दिले. राष्ट्र त्यांचे शौर्य आणि त्याग कधी विसरणार नाही. शहीद जवानांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे. या कठीण काळात राष्ट्र त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. आम्हाला भारताच्या शूरवीरांच्या शौर्य आणि धैर्याचा अभिमान आहे.”
S.Pophale/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1632075)
Visitor Counter : 204
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam