आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड-19 सद्यस्थिती
रुग्ण बरे होण्याचा दर 52.47% पर्यंत वाढला
कोविड-19 संदर्भातील गैरसमज दूर करण्यासाठी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने जारी केली मार्गदर्शक पुस्तिका
Posted On:
16 JUN 2020 4:57PM by PIB Mumbai
गेल्या 24 तासात कोविड-19 चे 10,215 रुग्ण बरे झाले आहेत. कोविड-19 चे आत्तापर्यंत एकूण 1,80,012 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचा दर 52.47% पर्यंत वाढला आहे; यावरून ही वस्तुस्थिती निदर्शनास येते कि कोविड-19 च्या एकूण रुग्णांपैकी निम्मे रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत.
सध्या 1,53,178 सक्रिय रुग्ण वैद्यकीय निरीक्षणाखाली आहेत.
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने कोविड -19 विषयीचे गैरसमज दूर करण्यासाठी या आजाराने पीडित लोक, कोविड -19 आजारातून बरे झालेले रूग्ण, आरोग्यसेवा प्रदाता योद्धे, त्यांचे कुटुंबीय इत्यादींच्या समस्यांचे निराकरण करणारी सविस्तर सचित्र मार्गदर्शक पुस्तिका जारी केली आहे.
मार्गदर्शक पुस्तिका यावर पाहू शकता:-
https://www.mohfw.gov.in/pdf/GuidetoaddressstigmaassociatedwithCOVID19.pdf
कोविड -19 शी संबंधित सर्व तांत्रिक मुद्द्यांविषयी, मार्गदर्शक तत्वांविषयी आणि सल्ल्यासंबंधी अधिकृत व अद्ययावत माहितीसाठी कृपया येथे नियमितपणे भेट द्याः https://www.mohfw.gov.in/ आणि @MOHFW_INDIA.
कोविड -19 शी संबंधित तांत्रिक प्रश्न technicalquery.covid19[at]gov[dot]in यावर तर इतर प्रश्न ncov2019[at]gov[dot]in and @CovidIndiaSeva यावर पाठवू शकता.
कोविड -19 वर काही प्रश्न असल्यास कृपया आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाशी संपर्क साधा : + 91-11-23978046 या हेल्पलाइनवर किंवा 1075 (टोल फ्री) क्रमांकावर. कोविड -19 वरील राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या हेल्पलाइन क्रमांकाची यादी देखील https://www.mohfw.gov.in/pdf/coronvavirushelplinenumber.pdf यावर उपलब्ध आहे.
S.Tupe/V.Joshi/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1631915)
Visitor Counter : 209
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam