रसायन आणि खते मंत्रालय

श्री मांडविया यांनी 5 खत संयत्रांच्या पुनरुज्जीवन प्रगतीचा घेतला आढावा


रामगुंडम प्रकल्पातून सप्टेंबर 2020 पासून तर गोरखपूर, बरौनी आणि सिंद्री प्रकल्पातून मे 2021 पासून उत्पादन अपेक्षित

पाच प्रकल्पांची कामे पूर्ण करण्यासाठी शक्य ती सर्व पावले उचलण्याचे श्री मांडवीया यांचे निर्देश

Posted On: 12 JUN 2020 4:17PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 12 जून 2020


केंद्रीय रसायन आणि खत राज्यमंत्री मनसुख मंडविया यांनी आज खत विभागातील अधिकाऱ्यांसोबत एक आढावा बैठक घेतली. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतलेल्या या बैठकीत त्यांनी 5 खत संयंत्रांच्या पुनरुज्जीवन प्रक्रियेच्या प्रगतीचा आढावा घेतला.

यात हिंदुस्तान उर्वरक रसायन लिमिटेड (HURL), गोरखपुर, बरौनी आणि सिंद्री; रामगुंडम फर्टिलायझर्स अँड केमिकल लिमिटेड (RFCL) आणि तालचेर फर्टिलायझर्स लिमिटेड (TFL) यांचा समावेश होता. या खत संयंत्रांच्या पुनरुज्जीवनाचे काम करणाऱ्या HURL, RFCL आणि TFL मधील ज्येष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

खत संयंत्रांच्या प्रत्यक्ष आणि वित्तीय प्रगतीचा आढावा घेताना मांडवीय यांनी संबंधित अधिकाऱ्यांना हे प्रकल्प लवकर पूर्ण करण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलण्याचे निर्देश दिले.

 

रामगुंडम फर्टिलायझर्स अँड केमिकल लिमिटेडने 99.53 % काम पूर्ण केल्याची माहिती यावेळी मंत्रीमहोदयांना देण्यात आली. मात्र Covid-19 मुळे काही लहान भागांचे काम पूर्ण होण्यात विलंब होत आहे. सप्टेंबर 2020 अखेरपर्यंत या प्रकल्पातून युरिया उत्पादन सुरू होईल, अशी अपेक्षा आहे

तसेच गोरखपूर, सिंद्री आणि बरौनी खत संयंत्रांचे प्रत्यक्ष काम अनुक्रमे 77%, 70 % आणि 69 % इतके पूर्ण झाले आहे. गोरखपूर, बरौनी आणि सिंद्री हे प्रकल्प मे 2021 पूर्वी पूर्ण होतील, अशी अपेक्षा आहे. ओदिशा मध्ये तालचेर खत संयंत्रामध्ये प्रकल्प-पूर्व कामांना सुरुवात झाली आहे. कोवीड-19 मुळे उद्भवलेल्या परिस्थितीत सुद्धा या प्रकल्पांचे काम वेगाने सुरू असल्याची माहिती मंत्रिमहोदयांना देण्यात आली.

युरिया क्षेत्रात नव्याने गुंतवणुकीसाठी आणि या क्षेत्रात भारताला स्वयंपूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारने नवीन गुंतवणूक धोरण (NIP) 2012 ची घोषणा केली आहे. या धोरणाअंतर्गत केंद्र सरकार सध्या बंद असलेल्या फर्टिलायझर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड आणि हिंदुस्तान फर्टिलायझर कॉर्पोरेशन लिमिटेडच्या पाच संयंत्रांचे पुनरुज्जीवन करीत आहे. सार्वजनिक क्षेत्रातील ही एकके पुढीलप्रमाणे आहेत.


रामगुंडम फर्टिलायझर्स अँड केमिकल लिमिटेड (RFCL)

तालचेर फर्टिलायझर्स लिमिटेड (TFL)

हिंदुस्तान उर्वरक रसायन लिमिटेड (गोरखपुर, बरौनी आणि सिंद्री) 


* * *

B.Gokhale/M.Pange/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1631135) Visitor Counter : 338