रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय

बीएस-6 चारचाकी वाहनांसाठी नंबर प्लेट स्टिकरसाठी वेगळ्या रंगाची पट्टी


नोंदणी तपशिलाच्या स्टिकरसाठी बीएस-6 वाहनांसाठी 1 सेंटीमीटर जाडीची हिरवी पट्टी 4 चाकी वाहनांच्या विंडशील्ड्सवर चिकटवली जात आहे

Posted On: 08 JUN 2020 8:35PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 8 जून 2020

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने 5 जून 2020 रोजी जारी केलेल्या एस.ओ. 1979 (ई) नुसार कोणत्याही इंधन प्रकारच्या बीएस- VI वाहनांसाठी नोंदणी तपशील असलेल्या विद्यमान म्हणजेच पेट्रोल आणि सीएनजी वाहनांवर हलक्या निळ्या रंगाचे आणि डिझेलच्या वाहनांवर केशरी रंगाच्या स्टिकरच्यावर 1 सेंटीमीटर जाडीची हिरवी पट्टी लावणे बंधनकारक केले आहे. आदेशानुसार, आता बीएस- VI वाहनांसाठी स्टिकरच्यावर 1 सेंटीमीटर जाडीची हिरवी पट्टी असेल.

1 एप्रिल 2020 पासून लागू करण्यात आलेली बीएस- VI उत्सर्जन मानके, कठोर आणि स्वच्छ उत्सर्जन मानके प्रदान करतात जी जगभरातील उत्सर्जन मानकांच्या अनुरूप आहेत. इतर देशांमध्ये ज्याप्रकारे अशा उत्सर्जन मानकांसाठी वेगळी ओळख असण्याच्या पद्धतीचे अनुसरण केले जाते त्याचप्रमाणे आपल्या देशात देखील अशी पद्धत लागू करावी अशी विनंती सरकारकडे करण्यात आली होती त्यानुसार ही पद्धत लागू करण्यात आली आहे.

 

B.Gokhale/S.Mhatre/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1630315) Visitor Counter : 367