रेल्वे मंत्रालय

गेल्या वर्षभरात भारतीय रेल्वेने सुरक्षिततेसाठी केलेली सर्वोत्कृष्ट कामगिरी; एप्रिल 2019 पासून रेल्वे अपघातामुळे जीवितहानी नाही


सुरक्षिततेत वाढ करण्याच्या उपायांमध्ये - रेल्वे फाटकांचे आत्तापर्यंतचे सर्वात जास्त उच्चाटन (1274 फाटक); 2019-2020 मध्ये 5181 किमी पर्यंत रेल्वे रुळांसाठी रेल्वेचे सर्वाधिक नूतनीकरण

एकूण 1309 रेल्वेवरील पूल / भुयारी मार्ग बांधले गेले; रेल्वे जाळ्याची सुरक्षा वाढविण्यासाठी 2019-2020 मध्ये 1367 पुलांचे पुनर्वसन करण्यात आले

Posted On: 08 JUN 2020 8:20PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 8 जून 2020

एप्रिल 2019 ते मार्च 2020 या कालावधीत भारतीय रेल्वेने सुरक्षेची सर्वात चांगली नोंद केली आहे. यावर्षीसह (01.04.2019 ते 08.06.2020 पर्यंत) कोणत्याही रेल्वे अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. भारतात 166 वर्षांपूर्वी 1853 मध्ये रेल्वे सेवा सुरू झाल्यापासून सन 2019-2020 मध्ये प्रथमच उल्लेखनीय कामगिरी केली गेली आहे. गेल्या 15 महिन्यांतील शून्य प्रवाशांच्या मृत्यूची नोंद म्हणजे भारतीय रेल्वेच्या सुरक्षिततेसाठी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांची पावती आहे. सुरक्षितता ही नेहमीच सर्वोच्च प्राथमिकता असते. मानवी रेल्वे फाटकांचे उच्चाटन, रेल्वेवरील पूल (आरओबीज), भुयारी मार्ग तयार करणे, पुलांचे पुनर्वसन, रेल्वे रुळांचे सर्वाधिक  नूतनीकरण, स्टील ऍथॉरिटी ऑफ इंडिया कडून वर्षभरात सर्वात जास्त रेल्वे पुरवठा, रेल्वे रुळांची प्रभावी देखभाल, सुरक्षेच्या दृष्टीकोनातून कडक देखरेख, रेल्वे कर्मचार्‍यांचे सुधारित प्रशिक्षण, सिग्नलिंग यंत्रणेत सुधारणा, सुरक्षेच्या कामांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, पारंपारिक आयसीएफमधून टप्प्याटप्प्याने आधुनिक व सुरक्षित एलएचबी कोचमध्ये रूपांतरण बदलणे इत्यादी गोष्टींचा समावेश सुरक्षा सुधारणांच्या उपाययोजनांमध्ये होतो.

सुरक्षा वाढविण्यासाठी भारतीय रेल्वेने खालील काही प्रमुख उपाययोजना केल्या आहेत:

  • सन 2018-19 मध्ये 631 मानवनिहाय पातळीवरील रेल्वे फाटकांचे उच्चाटन झाले. त्या तुलनेत 2019-20 मध्ये (गत वर्षाच्या दुप्पट) 1274 मानवनिहाय पातळीवरील रेल्वे फाटकांचे उच्चाटन झाले. हे रेल्वे फाटकांचे आत्तापर्यंतचे सर्वात मोठे उच्चाटन आहे.
  • रेल्वे जाळ्याची सुरक्षा वाढविण्यासाठी 2019-20 मध्ये एकूण 1309 रेल्वेवरील पूल / भुयारी मार्ग बांधण्यात आले.
  • गतवर्षी 1013 पुलांचे पुनर्वसन करण्यात आले होते त्या तुलनेत  2019-20 मध्ये 1367 पुलांचे पुनर्वसन करण्यात आले (गेल्या वर्षाच्या तुलनेत 37% अधिक)
  • 2019-2020 मध्ये 5181 किमी पर्यंत रेल्वे रुळांसाठी रेल्वेचे सर्वाधिक नूतनीकरण करण्यात आले (गत वर्षाच्या तुलनेत 20 % अधिक)जे 2018-19 मध्ये 4,265 किमी पर्यंत झाले होते.
  • स्टील ऍथॉरिटी ऑफ इंडिया कडून वर्षभरात सर्वात जास्त रेल्वे (13.8 लाख टन) पुरवठा झाला. 6.4 लाख टन लांब रेल्वेच्या पुरवठ्यामुळे फील्ड वेल्डिंगची व्याप्ती मोठ्या प्रमाणात कमी झाली आणि मालमत्तेची विश्वसनीयता आणखी वाढली.
  • 2019-20 मध्ये 285 रेल्वे फाटक सिग्नलद्वारे एकत्रित केले गेले आहेत, एकत्रित केलेल्या रेल्वे फाटकांची संख्या 11,639 आहे.
  • सुरक्षा सुधारण्यासाठी 2019-20 दरम्यान यांत्रिक सिग्नलिंग असणाऱ्या 84 स्थानकात विद्युत / इलेक्ट्रॉनिक सिग्नल लावण्यात आले आहेत.

सन 2017-18 मध्ये राष्ट्रीय रेल्वे सुरक्षा कोष (आरआरएसके) तयार करण्यात आला असून त्याअंतर्गत वार्षिक 20,000 कोटी रुपये नुसार पुढील पाच वर्षांत एक लाख कोटी रूपये खर्च करण्याच्या तरतुदीनुसार तातडीच्या स्वरूपाची अत्यंत गंभीर सुरक्षा कामे करणे शक्य झाले आहे आणि त्याचे निकालही स्पष्ट आहेत.

 

M.Jaitly/V.Joshi/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1630309) Visitor Counter : 245