कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय

जागरुकता आणि चिंता न करणे हीच कोविड-19 विरुद्धच्या लढाईची गुरुकिल्ली : डॉ. जितेंद्र सिंह


कोविड-19 रुग्णांसाठी भारतातील पहिली स्वदेशी, प्रभावी, वायरलेस शरीरक्रियात्मक (फिजिओलॉजिकल) मापदंड निरीक्षण प्रणाली, कोविड बिप (COVID BEEP) सुरु

Posted On: 07 JUN 2020 10:12PM by PIB Mumbai

 

केंद्रीय ईशान्य प्रदेश विकास (स्वतंत्र प्रभार) आणि पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी आज नवी दिल्ली येथे सांगितले की, जागरूकता आणि चिंता न करणे हीच कोविड-19 विरुद्धच्या लढाईतील गुरुकिल्ली आहे. आयआयटी हैदराबाद आणि अणु उर्जा विभाग यांच्या सहकार्याने ईएसआयसी वैद्यकीय महाविद्यालय हैदराबाद यांनी विकसित केलेली कोविड-19 रुग्णांसाठी भारतातील पहिली स्वदेशी, प्रभावी, वायरलेस शरीरक्रियात्मक (फिजिओलॉजिकल) मापदंड निरीक्षण प्रणाली, कोविड बिप (सतत ऑक्सिजनेशन व महत्त्वपूर्ण माहिती शोध बायोमेड ईसीआयएल ईएसआयसी पॉड) सुरु करताना त्यांनी, प्रभावीपणे आणि जवळपास दोन महिन्यांपासून सुरु असलेल्या लॉकडाउननंतर आता अनलॉकची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरू झाल्याने या साथीच्या रोगाचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी प्रतिबंध आणि जनजागृतीच्या महत्वावर भर दिला.

 आयआयटी हैदराबाद, ईसीआयएल, हैदराबाद आणि टीआयएफआर, हैदराबाद सारख्या नामांकित संस्थांच्या सहकार्याने सध्याच्या कोविड-19 संकटाच्या काळात विमाधारक व्यक्तींच्या कल्याणासाठी, आपल्या साधनांच्या यादीत आणखी एक नवीन उपक्रम राबविल्याबद्दल ईएसआयसी वैद्यकीय महाविद्यालय हैदराबाद यांच्या प्रयत्नांचे कौतुक करताना सिंह म्हणाले की, कोविड बिप, हे भारतातील नामांकित संस्था आपापसातील सहकार्याने कमी खर्चात देशाला भेडसावणाऱ्या बहुतेक आव्हानांवर तोडगा काढून त्यायोगे देशाला खर्‍या अर्थाने आत्मनिर्भर कसे करता येईल याचे एक उत्तम उदाहरण आहे. सिंह यांनी असेही सांगितले की, कोविड बिप, हे मूळ कोविड साठी एक प्रभावी औषध म्हणून उदयास येईल, एक अशी महामारी, जी सध्या संपूर्ण जगाला भेडसावत आहे.

कोविड बिपच्या नवीन प्ररुपात खालील गोष्टींचा समावेश केला आहे:

a. एनआयबीपी निरीक्षण: कोविड-19 मध्ये बाधित वृद्ध व्यक्तींच्या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. म्हणूनच, यासंदर्भात एनआयबीपीचे निरीक्षण  आवश्यक आहे.

b. ईसीजी निरीक्षण: प्रोफेलेक्सिस म्हणून वापरली जाणारी औषधे आणि / किंवा हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन आणि अझिथ्रोमाइसिन इत्यादी सारख्या उपचारांचा हृदयावर परिणाम होतो आणि म्हणूनच या संदर्भात ईसीजी निरीक्षण अत्यावश्यक आहे.

c. श्वसन वेग: बायो इम्पेडन्स पद्धतीने गणना केली जाते.

कोविड बीईपीमुळे प्रसाराचा धोका कमी होईल तसेच पीपीई सारख्या संसाधनांची बचत होईल.

डॉ. सिंह यांनी आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांचे निराकरण शोधण्यासाठी ईसीआयएल अंतर्गत येणाऱ्या अणुउर्जा विभागाच्या कामकाजाचे कौतुक केले. लोकांच्या आकलनशक्तीच्या उलट, मानवजातीच्या अधिक कल्याणसाठी अणू उर्जेच्या परोपकारी वापरास चालना देण्यासाठी अणु उर्जा विभाग सक्रियपणे कार्यरत आहे. वीज निर्मितीचे क्षेत्र असो, कृषी उत्पन्न वाढवणे, अन्नधान्य संवर्धन किंवा मग प्रशासन असो, अणुउर्जा विभाग मुंबईतील टीएमसी या नावाने प्रख्यात कर्करोग शास्त्र केंद्र, देशाला जेव्हा केव्हा आवश्यकता भासली आहे तेव्हा ते देशासाठी खंबीरपणे उभे राहिले आहे.

कोविड बिपचा विकास हे त्याच दिशेने एक पाऊल आहे. डॉ. सिंह यांच्या अगोदर गृह राज्यमंत्री जी. किशन रेड्डी, अणुऊर्जा विभागाचे सचिव के.एन. व्यास, ईएसआयसी वैद्यकीय महाविद्यालय हैदराबाद यांचे अधिष्ठाता प्रा. श्रीनिवास, ईसीआयएल, हैदराबादचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक रीअर अ‍ॅडमिरल संजय चौबे (निवृत्त) यांनी देखील बोलताना, सध्याच्या परिस्थितीत अशा प्रकारच्या शोधांचे महत्व अधोरेखित केले.

 

B.Gokhale/ S.Mhatre/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1630137) Visitor Counter : 394