अर्थ मंत्रालय
राज्यांसाठी जीएसटी भरपाई म्हणून केंद्राने 36,400 कोटी रुपये केले जारी
Posted On:
04 JUN 2020 8:28PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 जून 2020
कोविड-19 ची सद्यस्थिती पाहता, राज्य सरकारांना खर्च करण्यासाठी निधीची आवश्यकता आहे; तसेच या सध्याच्या परिस्थिती मध्ये त्यांच्या स्रोतांवरही विपरीत परिणाम झाला आहे, हे लक्षात घेऊन केंद्र सरकारने आज, डिसेंबर 2019 ते फेब्रुवारी 2020 या कालावधीसाठी, राज्य/केंद्र शासित प्रदेशांना 36,400 कोटी रुपयांची जीएसटी भरपाई जारी केली आहे.
एप्रिल-नोव्हेंबर 2019 या कालावधीसाठी 1,15,096 कोटी रुपयांची जीएसटी भरपाई राज्य/केंद्रशासित प्रदेशांना याआधीच देण्यात आली आहे.
S.Pophale/S.Mhatre/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1629551)
Visitor Counter : 298