पंतप्रधान कार्यालय
चक्रीवादळामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा पंतप्रधानांनी घेतला आढावा
जनतेला सुरक्षा उपायांसह सावधगिरी बाळगण्याचे केले आवाहन
प्रविष्टि तिथि:
02 JUN 2020 6:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 2 जून 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर घोंघावणाऱ्या चक्रीवादळामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी नागरिकांना शक्य ती सर्व सावधगिरी बाळगण्याचे तसेच सुरक्षा उपाययोजना करण्याचे आवाहन केले.
“भारताच्या पश्चिम किनारपट्टी भागातील चक्रीवादळामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेतला. सर्वांच्या सुरक्षेसाठी प्रार्थना करत आहे. मी नागरिकांना आवाहन करतो की, त्यांनी शक्य ती सर्व सावधगिरी बाळगावी आणि सुरक्षा उपाय करावेत.”, असे पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
R.Tidke/S.Pophale/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1628709)
आगंतुक पटल : 210
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Punjabi
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam