संरक्षण मंत्रालय

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचा फ्रान्सच्या सशस्त्र सैन्याच्या मंत्र्यांशी संवाद


भारत आणि फ्रान्स दरम्यान द्विपक्षीय संरक्षण सहकार्य मजबूत करण्यास सहमती

Posted On: 02 JUN 2020 4:34PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 2 जून 2020

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी फ्रान्सच्या सशस्त्र सैन्याच्या मंत्री मिस फ्लॉरेन्स पार्ले यांच्याशी दूरध्वनीद्वारे आज संवाद साधला. कोविड-19 ची परिस्थिती, प्रादेशिक सुरक्षा याबाबत परस्पर सामंजस्य, आणि भारत आणि फ्रान्स यांमध्ये द्विपक्षीय संरक्षण विषयक सहकार्य मजबूत करण्यास सहमती दर्शविली. कोविड-19 या साथीच्या आजाराशी लढा देण्यासाठी भारत आणि फ्रान्सच्या सशस्त्र सैन्याने केलेल्या प्रयत्नांचे कौतुक दोन्ही मंत्र्यांनी केले.

देशभर कोविड-19 या साथीच्या आजाराने उद्‌भवलेल्या आव्हानांना सामोरे जात फ्रान्सने राफेल विमानांचे वेळेवर वितरण सुनिश्चित करण्याला पुष्टी दिली.

संरक्षणमंत्र्यांनी 2020 ते 2022 पर्यंत हिंद महासागर नौदल संमेलनाच्या (आयओएनएस) फ्रेंच अध्यक्षपदाचे स्वागत केले. 2018 च्या हिंद महासागर भागावर भारत-फ्रान्स संयुक्तरित्या रणनीतिकदृष्ट्या काम पूर्ण करण्यासाठी दोनही मंत्र्यांनी एकत्र काम करण्याचे मान्य केले.

 

M.Jaitly/S.Shaikh/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1628642) Visitor Counter : 217