अल्पसंख्यांक मंत्रालय
अल्पसंख्यांक व्यवहार मंत्रालयाच्यावतीने गेल्या सहा वर्षात केलेले काम आणि मिळालेले यश यावर प्रकाश टाकणारे ‘माहितीआलेख’ प्रसिध्द
Posted On:
31 MAY 2020 7:28PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 31 मे 2020
अल्पसंख्यांक व्यवहार मंत्रालयाच्यावतीने गेल्या सहा वर्षांमध्ये ज्या कामांसाठी पुढाकार घेण्यात आला आणि ती कामे यशस्वी करण्यात आली अशा कामांची माहिती देण्यासाठी हिंदी आणि इंग्लिश भाषेमध्ये प्रत्येकी पाच ‘इन्फोग्राफिक्स’ म्हणजेच ‘माहितीआलेख’ संच प्रकाशित करण्यात आले आहेत. समाज माध्यमांमधून हे माहितीआलेख लोकांपर्यंत पोहोचवणे सहज शक्य होणार आहे. या प्रत्येक आलेखांमध्ये महत्वपूर्ण काम केलेल्या पाच विस्तृत विषयांची मांडणी, चित्रण करण्यात आले आहे. या माध्यमातून अल्पसंख्यांकांच्या कल्याणासाठी सरकारने राबवलेल्या जवळपास सर्व योजनांची माहिती देण्यात आली आहे. या योजना अशा आहेत:-
- कौशल्य विकास, रोजगार आणि रोजगाराच्या संधी.
- हुनर हाट – कलाकुसर, पाककला यासारख्या क्षेत्रांत कार्यरत असलेल्या महिलांचे सशक्तीकरण.
- प्रधान मंत्री जन विकास कार्यक्रम (पीएमजेव्हीके)- संपूर्ण देशभर अल्पसंख्यांकबहुल क्षेत्रामध्ये सामाजिक-आर्थिक आणि रोजगार निर्माणाच्या संधी मिळतील, अशा पायाभूत सुविधा तयार करण्यासाठी दिलेले प्राधान्य.
- शैक्षणिक सक्षमीकरण; आणि
- वक्फ मालमत्तेचा उपयोग- वक्फच्या मालमत्तेचे अंकीकरण करून त्याच्या मदतीने समाज कल्याणासाठी वक्फच्या मालमत्तांचा उपयोग करण्यासाठी कार्य.
या मंत्रालयाच्यावतीने तयार करण्यात आलेले ‘माहितीआलेख’ सर्वांना समजून घेणे सोईचे व्हावे, तसेच केलेल्या कामाविषयी योग्य संदेश सामान्य लोकांपर्यंत पोहोचावा, यासाठी त्यामध्ये चित्रे, छायाचित्रे आणि मजकुराचा वापर करण्यात आला आहे.
(इंग्लिश आणि हिंदी माहितीआलेख पाहण्यासाठी येथे क्लिक करावे.)
* * *
B.Gokhale/ S.Bedekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1628196)
Visitor Counter : 218